शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

गुलाबी थंडीची चाहूल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 11:34 PM

दरवर्षी ऐन दिवाळीत लागणारी गुलाबी थंडीची चाहूल लागायला यंदा देवदिवाळी अर्थात दीपोत्सव पर्वाच्या सांगतेचा मुहूर्त लागला आहे. मंगळवारपासून सकाळी आणि सायंकाळी हवेत गोडगुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

नाशिक : दरवर्षी ऐन दिवाळीत लागणारी गुलाबी थंडीची चाहूल लागायला यंदा देवदिवाळी अर्थात दीपोत्सव पर्वाच्या सांगतेचा मुहूर्त लागला आहे. मंगळवारपासून सकाळी आणि सायंकाळी हवेत गोडगुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.पाऊस आणि थंडी यांच्या नात्याची सांगड सामान्यपणे घातली जाते. पाऊस कमी पडला म्हणजे थंडीही पडणार नाही आणि पाऊस खूप पडला तर थंडीही खूप पडणार असेच समीकरण गृहीत धरतो. हे समीकरण तज्ज्ञांना मान्य नसले तरी प्रदीर्घ काळ पाऊस पडल्यावर उशिराने थंडीला प्रारंभ आणि उशिरापर्यंत कायम राहण्याची शक्यता असते. यंदाच्या वर्षी सरासरीच्या दुप्पट आणि अगदी दिवाळी पश्चातही पाऊस पडत राहिल्याने उशिरा सुरू झालेली थंडीचा कडाका उशिरापर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत. सामान्यपणे आॅक्टोबरच्या मध्यात सुरू होणारी थंडी यावेळी नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होत आहे. म्हणजेच थंडीला जवळपास एक महिनाभर उशीर झाला असून, हा ऋतुचक्र बदलाचाच परिणाम असल्याची चर्चा त्यामुळे घडू लागली आहे. गेल्या दशकभराहून अधिक काळात प्रथमच इतक्या उशिरा थंडीची चाहूल लागत आहे. त्यामुळे बदललेले हे चक्र आता असेच कायम राहण्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली वादळे, कमी दाब क्षेत्राचा प्रभाव यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे आगमन सुरू झाल्यापासूनच थंड हवेची शिरशिरी जाणवू लागली आहे. हिवाळ्यात नोव्हेंबरच्या प्रारंभीच तापमानाचा पारा साधारणपणे किमान १० ते १२ अंशांवर जातो. मात्र, यंदाच्या वर्षी हा आकडा गाठायला नोव्हेंबरअखेर किंवा हुडहुडी भरवणाºया थंडीसाठी डिसेंबरचीच वाट पाहावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.गोल्फ क्लबचे काम सुरू असल्याने तिथे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची अडचण झाली आहे. काही वॉकर्सनी नजीकच्या इदगाह मैदानावरच फेºया मारण्यास प्रारंभ केला, तर अनेकांनी कृषिनगर जॉगिंग ट्रॅककडे मोर्चा वळवल्याने आता कृषिनगरच्या ट्रॅकवर दरवर्षीच्या तुलनेत दुप्पट नागरिक येत असल्याने नियमित वॉकर्सना ही गर्दी त्रासदायक ठरू लागली आहे.हिवाळ्याच्या प्रारंभी गर्दी वाढण्याचा अनुभव हा नेहमीचा असला तरी यंदाच्या वर्षी गोल्फ क्लबचा पर्याय बंद असल्याने त्यात खूप अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. अजून डिसेंबर येणे बाकी असून, थंडीच्या कडाक्याच्या मौसमात अन्य जॉगिंग ट्रॅकवरही गर्दीचे प्रमाण वाढणार आहे.बदलत्या वातावरणाचा परिणामसलग निर्माण झालेली चक्र ीवादळे आणि कमी दाबाचे क्षेत्र यांच्या प्रभावामुळे राज्याने यंदा सुमारे पाच महिन्यांचा पावसाळा अनुभवला. एरवी गुलाबी थंडीची चाहूल घेऊन येणारी दिवाळी यंदा पावसात भिजल्याचा अनुभव नाशिकसह राज्यभरातील नागरिकांना घ्यावा लागला. त्यानंतरही वातावरण ढगाळच राहिले. आता मात्र हवामान निवळले असून, राज्यात सगळीकडे थंडीची सुरु वात होत असल्याचे चित्र जाणवू लागले आहे. गत दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानातील तफावतही थंडीचे आगमन होत असल्याचे दर्शवत आहे. उत्तरेकडील थंड वाºयाचा प्रभाव हळूहळू राज्यात जाणवू लागण्याची चिन्हे आहेत. सध्या पहाटेच्या वेळी धुक्याची चादर पसरत आहे. त्यामुळे आगामी तीन ते चार दिवसांत थंडीचा प्रभाव सगळीकडे अजून वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणTemperatureतापमान