नाशिक : भोसला मिलिटरी स्कूल-संतकबीरनरगरमार्गे मोतीवाला कॉलेज पाईपलाईनरोडला जोडणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्याभोवती संरक्षण कठडे नसल्याने हा रस्ता अपघाताचे केंद्र बनत आहे. या रस्त्यालगत असलेल्या नाल्यात दुपारच्या सुमारास मारुती सियाज (डीएन-०९ एल१९१०) ही कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाल्यात कोसळली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.भोसला स्कूलमार्गे पाईपलाईनरोडला जोडणाºया या रस्त्यावर वाहतूक व वर्दळ असते; मात्र या रस्त्यालगत वाहणाºया नाल्याला संरक्षण कठडे नसल्याने सदर ठिकाणी अपघाती स्थळ बनले आहे. या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर वाहतूकीला वेग आला आहे. रस्त्यावरुन वाहतूक वाढल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. गणेशनगर आणि समर्थनगरमधून जाणाºया नाल्यात आज दुपारी कार कोसळून अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच तत्काळ सातपूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.
शालेय वाहतूकीचे प्रमाण अधिकसोमेश्वर कॉलनी, गणेशनगर, समर्थनगर, खांदवेनगर, गुलमोहर कॉलनी, धु्रवनगर, हनुमाननगर आदि भागातील विद्यार्थ्यांची वाहतूकीचा हाच मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यालगत वाहणाºया नाल्याला तातडीने सुरक्षित करण्याची गरज आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित संरक्षण कठडे बांधावे. कारण रस्ता अरुंद असून रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण झाल्यामुळे वाहतूकही वाढत आहे.