शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नाशकात घरोघर थेट गॅसपुरवठ्यासाठी पाइपलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:56 PM

नाशिक : मुंबईच्या धर्तीवर नाशकातदेखील नजीकच्या काळात घरोघरी थेट पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्यासाठीची योजना आकार घेत आहे. या योजनेंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, येत्या आठवड्यात या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशुभ वर्तमान : पहिल्या टप्प्यात ३५ किलोमीटरचे काम

नाशिक : मुंबईच्या धर्तीवर नाशकातदेखील नजीकच्या काळात घरोघरी थेट पाइपलाइनने गॅसपुरवठा करण्यासाठीची योजना आकार घेत आहे. या योजनेंतर्गत शहरात पहिल्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, येत्या आठवड्यात या कामाला प्रारंभ करण्यात येणार आहे.महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पालघरच्या प्रकल्पातून थेट पाइपलाइनद्वारे नाशिकला गॅसपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी गॅसचा साठा करण्यासाठी विल्होळीत स्टेशन उभारण्यात येणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात ३५ किलोमीटरची पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम पालघर ते नाशिक पाइपलाइनचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी २५० किलोमीटरची पाइपलाइन टाकली जाणार आहे.

 या कामासाठी करण्यात आलेले सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. नाशिकमधील पाइपलाइनच्या कामकाजासाठी रोड डॅमेज चार्जेस म्हणून ८ कोटी रुपये कंपनीकडून महापालिकेला अदा करण्यात आले आहेत. तसेच महानगराच्या ज्या भागात खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, त्या परिसरात कंपनीने त्वरित काम सुरू करण्याचे निर्देशदेखील महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. कंपनीने नुकतेच जेल रोड आणि शिंदे, पळसे तसेच पाथर्डी फाटा येथे सीएनजी पंपाच्या कामकाजाला प्रारंभ केला आहे. त्याशिवाय महानगरात अन्यत्र काही ठिकाणी सीएनजी पंप उभारण्याच्या कामालादेखील गती देण्यात येणार आहे.मनपाच्या शहर बससाठी सुविधामहापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या शहर बससेवेसाठी महापालिकेच्या जागेत पाच सीएनजी पंप उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मनपाच्या भविष्यातील शहर बससेवेसाठीदेखील हक्काच्या इंधनाची सोय होऊ शकणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक