नाशिक : उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात जबरी लुटीच्या इराद्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर-२२० प्रकारच्या तीन दुचाकी शहराच्या वेशीवर रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी शनिवारी (दि.१५) पोलिसांना आढळून आल्या आहेत. या दुचाकींच्या क्रमांकावरून या गुन्ह्याच्या तपासाला आता पोलीस गती देऊ शकणार आहे; मात्र तीनही पल्सरसोबत हेल्मेटदेखील पोलिसांना मिळून आल्याने हल्लेखोर शहराच्या नाकाबंदीमधून हेल्मेटसक्तीचा फायदा घेत वेशीबाहेर पोहचल्याचे बोलले जात आहे.शहराची कायदासुव्यवस्था मागील काही दिवसांपासून कमालीची ढासळली आहे. रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे.सॅम्युअलच्या शरीरातून मिळाल्या पाच गोळ्यामुथूट फायनान्समधील लाखोंचा ऐवज सुरक्षित ज्याच्यामुळे राहिला तो कर्तव्यदक्ष युवा कर्मचारी मुरियायिकारा साजू सॅम्युएलचे प्रसंगावधान प्रेरणा देणारेच आहे. त्याने जिवावर उदार होऊन धोक्याची जाणीव व्हावी, यासाठी आपत्कालीन सायरन धाडसाने वाजविला. यामुळे हल्लेखोरांची भंबेरी उडाली आणि त्यांना दागिने, रोकड लुटता आली नाही; मात्र त्यांनी सॅम्युएलवर त्याचा राग काढून बंदुकीतून एक दोन नव्हे, तर तब्बल पाच राउंड रिकामे केले. यामुळे त्या धाडसी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जेव्हा केले गेले तेव्हा शरीरातून हल्लेखोरांनी झाडलेल्या पाच गोळ्या मिळून आल्या.पोलिसांच्या ‘नाका’खालून ओलांडली वेसपोलिसांच्या ‘नाका’खालून ओलांडली वेस्हल्लेखोरांनी क्षणार्धात पोलिसांच्या ‘नाका’खालून ते सहजरीत्या निसटले. हल्ल्याची माहिती मिळताच सर्व शहरात तसेच जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिले गेले आणि नाक ाबंदी वाढविली गेली. तपासपथके रवाना झाली; मात्र हाती काहीही लागले नाही. हल्लेखोरांनी शहराची वेस यशस्वीपणे ओलांडली आणि रामशेजजवळ गुन्ह्यात वापरलेल्या दुचाक्या सोडून पोबारा केला. यावरून पोलिसांच्या नाकाबंदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण नाकाबंदी असतानाही उंटवाडी ते रामशेजपर्यंत सुमारे २० किलोमीटरचे अंतर हल्लेखोरांनी दुचाकीवरून कसे कापले? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरोडेखोरांच्या पल्सर आढळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 1:39 AM
उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात जबरी लुटीच्या इराद्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर-२२० प्रकारच्या तीन दुचाकी शहराच्या वेशीवर रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी शनिवारी (दि.१५) पोलिसांना आढळून आल्या आहेत. या दुचाकींच्या क्रमांकावरून या गुन्ह्याच्या तपासाला आता पोलीस गती देऊ शकणार आहे
ठळक मुद्देमुथूट गोळीबार । तीन हेल्मेट, शर्ट सोडून हल्लेखोर जिल्ह्याबाहेर;तपासाला गती मिळणार?