नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेच्या सदस्यांनी बागलाण तालुक्यातील इतिहासकालीन पिसोळ किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत परिसर उजळून टाकला.शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेच्या सदस्यांनी किल्ल्यावरील सर्व चॉकलेटची पाकिटे, बिस्कीट, वेफर्स व कुरकुरे यांची पडलेली रिकामी पाकिटे तसेच रिकाम्या पाण्याच्या बाटल्या एकत्र जमा करत त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी संस्थेच्या सदस्यांची एक साखळी तयार करण्यात आली होती. सुरुवातीस किल्ल्यावरील मुख्य दरवाजा जवळील तटबंदीवर असलेले मोठमोठी काटेरी झुडपे काढून तटबंदी स्वच्छ करण्यात आली. त्यानंतर किल्ल्यावर असलेल्या मारुती मंदिर, गणपती मंदिर, रामकुंड, सीताकुंड, मशीद परिसराची स्वच्छता करत परिसर उजळून टाकला. त्याचप्रमाणे इतिहासकालीन असलेल्या हत्तीटाका, मोतीटाका, चुनचुन्या टाका या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. पाण्याच्या टाक्यांच्या कपारीवरील पृष्ठभागावर आलेले गवत व काटेरी झुडपे काढून टाकण्यात आली. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कब्रस्थानांचीदेखील यावेळी स्वच्छता करण्यात आली.चिमुरड्यांचाही उत्स्फूर्त सहभागआतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून शिवनेरी, हरिश्चंद्र गड, त्रिंगलवाडी किल्ला, रायगड आदींसह अनेक शिवकालीन इतिहास लाभलेल्या महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर भ्रमंती करत स्वच्छता अभियान राबवले आहे. यावेळी ह्यजय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजेह्णचा जयघोष करण्यात येत होता. विशेष म्हणजे या स्वच्छता मोहिमेत लहान मुलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.या मोहिमेसाठी श्याम गव्हाणे, सोमनाथ गव्हाणे, विजय महाले, बाळू शिंदे, प्रदीप सोनवणे, शरद शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
...अन् शिवकालीन पिसोळ किल्ला उजळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 11:29 PM
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कु-हेगाव येथील शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेच्या सदस्यांनी बागलाण तालुक्यातील इतिहासकालीन पिसोळ किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवत परिसर उजळून टाकला.
ठळक मुद्देस्वच्छता मोहीम : शिवदुर्ग संवर्धन, भ्रमंती संस्थेचा उपक्रम