शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

द्वारकेवर पाच जीवंत काडतुसांसह पिस्तुल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 4:28 PM

शहरात मागील काही दिवसांपासून गावठी पिस्तुलांची देवाणघेवाणीचा प्रयत्न पोलिसांना आव्हान देणारा ठरत आहे.

ठळक मुद्देगावठी पिस्तुलची देवाणघेवाण आव्हानात्मक

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत विनापरवाना अवैधरित्या जवळ शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. द्वारका परिसरात अशाच पध्दतीने एक इसम गावठी पिस्तुलसह पाच जीवंत काडतुसे घेऊन आल्याची कुणकु ण पोलिसांना लागताच पोलिसांनी त्यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले.याबाबत अधिक माहिती अशी, अ‍ॅक्टिवा दुचाकीने (एम.एच१५ एफएच४४५२) संशयित इसम अराफत फैरोज शेख (२०, इगतपुरी चाळ, वडाळानाका) हा द्वारका परिसरात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे इसम व वाहनाचे वर्णन जुळून आल्याची खात्री पटताच गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरिक्षक दत्ता पवार, सहायक निरिक्षक ज्ञानेश्वर मोहिते, हवालदार सोमनाथ सातपुते, उत्तम पाटील आदिंच्या पथकाने सापळा रचून शिताफीने अराफतला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता ३० हजार रूपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तुल व अडीच हजार रूपये किंमतीचे पाच जीवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली ४० हजार रू पये किंमतीची दुचाकी असा एकूण ७२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अराफतविरूध्द विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-गावठी पिस्तुलची देवाणघेवाण आव्हानात्मकशहरात मागील काही दिवसांपासून गावठी पिस्तुलांची देवाणघेवाणीचा प्रयत्न पोलिसांना आव्हान देणारा ठरत आहे. शहरात खुलेआम अशा पध्दतीने जीवंत काडतुसांसह देशी पिस्तुलांची हाताळणी होत असेल तर कायदासुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापुर्वीही भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत जुने नाशिक या भागात हाणामाऱ्यांमध्ये तसेच खून व खूनाच्या प्रयत्नात शस्त्रांचा वापर झालेला दिसून येतो. काही दिवसांपुर्वी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत अशाचप्रकारे गुन्हे शाखा युनीट-१च्या पथकाने सापळा रचून मोटारीतून पिस्तुल घेऊन जाणा-या त्रिकुटांना ताब्यात घेतले होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक