नांदूरशिंगोटे : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नाशिक - पुणे महामार्गावर मानोरी फाटा ते नांदूरशिंगोटे हा सर्व्हिस रोड तयार केला. मात्र या रस्त्यावर मोठा खड्डा पडलेला असून तो अपघाताला निमंत्रण देत आहे. हा खड्डा बुजविण्याकडे प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. हा खड्डा तत्काळ बुजविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. नाशिक-पुणे हा राष्ट्रीय महामार्ग पूर्वी नांदूरशिंगोटे गावातून जात होता; परंतु गेल्या चार वर्षांपूर्वी रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने बाह्यवळण रस्ता गावाच्या बाहेरून गेला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी झाली असली तरी परिसराला जोडणारे रस्ते गावातून जात असल्याने काही प्रमाणात वाहनांची ये - जा असते. मानोरी फाटा ते एकवीरा पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सर्व्हिस रोड बनविण्यात आले आहेत. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांना गावातील दळणवळणासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड ठेवण्यात आला आहे. मात्र या रस्त्यावर थोड्याच दिवसांत सुमारे दोन फूट रुंदीचा व १० ते १२ फूट लांबीचा आडवा खड्डा पडला आहे. त्यामुळे अनेकदा वरिष्ठ पातळीवर तक्रारी करूनसुद्धा दुर्लक्ष होत आहे. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अवजड वाहनांना नुकसान सोसावे लागत आहे.
-------------------
दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले अनेकदा रात्रीच्या वेळेस खड्डे लक्षात न आल्याने दुचाकीवरून घसरण्याचे प्रकार घडले आहेत. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार आहे. त्यापूर्वी हा खड्डा बुजविणे आवश्यक आहे, अन्यथा या खड्ड्याचे स्वरूप मोठे होऊन नवीन अपघातस्थळ तयार होईल. त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी हा खड्डा तत्काळ बुजविण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
------------------ नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर नांदूरशिंगोटे बाह्यवळण रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर पडलेला जीवघेणा खड्डा. यामुळे अपघात होत आहेत. (२७ नांदूरशिंगोटे १)
===Photopath===
270521\143427nsk_7_27052021_13.jpg
===Caption===
२७ नांदूरशिंगोटे १