नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाल्याचे चित्र आहे. वाहन चालविताना चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत असून, खराब रस्त्यांमुळे छोटे-मोठे अपघात या भागात नेहमी घडत आहेत. नांदूरशिंगोटे परिसरातील दोडी बुद्रुक, मानोरी, कणकोरी, निऱ्हाळे, मऱ्हळ, सुरेगाव आदि गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे असणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण होणे महत्त्वाचे आहे. प्रामुख्याने कणकोरी पाटी ते निऱ्हाळे दरम्यान दोन किलोमीटर रस्त्याचे जागोजागी डांबर उखडले असून, खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी खडी उघडी पडली आहे. या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते. सुमारे १५ वर्षांपूर्वी कणकोरी-निऱ्हाळे रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. रस्त्याने पायी चालणेसुद्धा अवघड झाले आहे. (वार्ताहर)
नांदूरशिंगोटेच्या रस्त्यांची दयनीय अवस्था
By admin | Published: February 09, 2015 12:07 AM