नाशिक : समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्य व साहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ कादंबरीचे युवा लेखक नवनाथ गोरे यांनी केले.सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी (दि.१३) करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून गोरे बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ‘लोकमत’च्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर होत्या. समवेत कवी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी संजय चौधरी, सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके उपस्थित होते. यावेळी गोरे म्हणाले, नाशिकच्या भूमीने शारदेला अनेक बहुमूल्य रत्न दिले आहे, त्यामुळे ही भूमी नेहमीच श्रेष्ठ ठरणारी आहे. या भूमित मेळाव्याच्या निमित्ताने प्रथमच पाय ठेवण्याची संधी लाभली हे भाग्यच. काळानुरूप साहित्यिकाने आपल्यामध्ये बदल करून माहिती तंत्रज्ञानाच्या युगाचा फायदा साहित्याच्या प्रगतीसाठी करून घ्यायला हवा. कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचे झाले तर ‘शेवटी साहित्यिक हा शब्दांचा सौदागर आहे’, हे विसरून चालणार नाही, असे गोरे म्हणाले.प्रास्ताविक प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. शंकर बोºहाडे यांनी केले.आजचा काळ गुंतागुंतीचा : अपर्णा वेलणकरअपर्णा वेलणकर यांनी आजचा अभिव्यक्तीचा काळ हा संभ्रमावस्था निर्माण करणारा असल्याचे सांगितले. सोशल मीडियाद्वारे मनुष्य हजारोंच्या संख्येने लोकांशी जोडला गेला असला तरीदेखील त्याला त्याच्या मनातील गोष्टी बोलून दाखविण्यासाठी असा एक जवळचा मित्र या काळात सापडणे दुरापास्त झाले आहे, हीदेखील चिंतेची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे हा काळ एकाकीपणाची जाणीवदेखील करून देतो.
समाजात साहित्यिकाचे स्थान अबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 12:31 AM
समाजमनावर माध्यमांचा प्रभाव पडत जरी असला तरी नव्या पिढीच्या लेखनावर त्याचा परिणाम होईल असे वाटत नाही. सोशल मीडियाच्या काळातही साहित्य व साहित्यिक सुरक्षित असून, त्यांचे महत्त्व कायम अबाधित राहणार आहे, यात तीळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन ‘फेसाटी’ कादंबरीचे युवा लेखक नवनाथ गोरे यांनी केले.
ठळक मुद्देनवनाथ गोरे : सावानाच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन