नाशिक : शहरातून शनिवारी (दि.२४) काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मोक्याच्या ठिकाणी मोर्चाच्या प्रचारासाठी भव्य फलक लावण्यात आले आहेत. या फलकांच्या माध्यमातून शहरातील मराठा समाजातील नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, मोर्चातील मागण्याही या फलकांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी कायद्यामुळे इतर समाजालाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, आज जी वेळ मराठा समाजावर आहे, ती इतर समाजावरही येऊ शकते असे भावणिक आवाहनही या फलकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच समाजातील वाढलेल्या अपप्रवृत्तीमुळे समाजातील महिला, मुली सुरक्षित नसल्याने मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे स्पष्टीकरणही फलकांच्या माध्यमातून करण्यात येत असून, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि अॅट्रसिटी कायदा रद्द करण्याची मागणी या फलकांच्या माध्यमातून उचलून धरण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वाहनांवरही मराठा मोर्चाचे पोस्टरमराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने वाहनावर मोर्चाचा प्रचार करण्याचे आवाहन विविध ठिकाणी होणाऱ्या बैठकांसह सोशल माध्यमातून होत असून, शहरातील दुचाकी, चारचाकी, रिक्षासारख्या वाहनांवर मराठा मोर्चाचे स्टीकर आणि पोस्टर्स दिसून येत आहे. त्याचप्रमाणे असे स्टिकर अथवा पोस्टर्स बनवून देण्याऱ्यांचे संपर्क क्रमांक सोशल मीडियात फिरत आहेत. काही मराठा व्यावसायिक असे पोस्टर वाजवी दरातच पोस्टर बनवून देत असून, अशाप्रकारे वाहनांवर मोर्चाचे फ लक, स्टीकर आणि पोस्टर लावण्याच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मराठा मोर्चाचे शहरात विविध ठिकाणी फलक
By admin | Published: September 20, 2016 1:56 AM