नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण पंधरा ठिकाणांपैकी पाच मतदारसंघांची मतमोजणी करण्यात आली. मतदारसंघनिहाय टेबल आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांनी मतमोजणीस प्रारंभ केला. पहिल्या फेरीला काहीसा विलंब आणि साधारणत: पन्नास ते पंचावन्न मिनिटे लागली खरी, मात्र नंतर सरावलेल्या कर्मचाऱ्यांनी मतमोजणीस वेग घेतला आणि अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटांत पुढील फेºया पार पडल्या.शहरातील पूर्व नाशिकमधील वादामुळे वारंवार आलेला व्यत्यय वगळता अन्य मतदारसंघांत फारशी अडचण कोठेही उद्भवली नाही आणि मतमोजणी शांततेत पार पडली.नाशिक जिल्ह्णातील पंधरा मतदारसंघांत मोठ्या उत्साहात आणि अत्यंत शांततामयी मार्गाने निवडणूक पार पडली. त्यानंतर संबंधित मतदारसंघांतच सर्व मतमोजणीच्या जागा निर्धारित करण्यात आल्या होत्या. नाशिक शहरात नाशिक पूर्व मतदारसंघाची मतमोजणी मीनाताई ठाकरे स्टेडियम, मध्य मतदारसंघाची मतमोजणी गायकवाड सभागृहात तर नाशिक पश्चिमची मतमोजणी सिडकोतील संभाजी स्टेडियम आणि देवळाली मतदारसंघाची मतमोजणी महापालिकेच्या विभागीय कार्यालयात पार पडली. इगतपुरी मतदारसंघाची मतमोजणी शासकीय कन्या विद्यालयात पार पडली. सकाळपासून पोलिसांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मतमोजणी केंद्रांकडे जाणारे अनेक रस्ते तर सकाळी सहा वाजेपासूनच बंद ठेवण्यात आले होते.मतमोजणीच्या ठिकाणी जाणाºया कर्मचाºयांचीदेखील कसून तपासणी करण्यात आली. त्यांना बरोबर डिजिटल डिव्हाईस नेण्यास मनाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे उमेदवारांच्या प्रतिनिधींची देखील कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतरच त्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आला. सर्व केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रत्येक मतमोजणीच्या ठिकाणी टेबलची संख्या वेगवेगळी होती. नाशिक पश्चिममध्ये १४ टेबल्स होते आणि २७ फेºया होत्या. नाशिक पूर्वमध्ये १४ टेबल्स होते तर २३ फेºया झाल्या. नाशिक मध्यमध्ये २२ तर इगतपुरीत २१ फेºया होत्या. जिल्ह्णात सर्वात कमी म्हणजे एकोणावीस फेºया देवळाली मतदारसंघात होत्या. याठिकाणी सकाळी कर्मचाºयांनी मतमोजणीस प्रारंभ करताना सर्व प्रथम टपाली मतांची मोजणी केली. त्यातील मतांची नोंदणी झाल्यानंतर उमेदवारांच्या प्रतिनिधींना मतदान यंत्रे असलेल्या ठिकाणी नेऊन स्ट्रॉँगरूम दाखवण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली.कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साहपोलिसांनी कितीही प्रतिबंध केला तरी मतमोजणी केंद्राच्या निषिद्ध क्षेत्राकडे कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड होती. नागरिकही जमले होते. प्रत्येक फेरीनिहाय मतमोजणी झाल्यानंतर आघाडीवर असलेल्या उमेदवाराचे समर्थक जल्लोष करीत होते. देवळाली मतदारसंघात तर सरोज आहिरे यांनी निर्णायक आघाडी मिळवताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला.दातीर, शिंदे यांचे बहिर्गमनमध्यमध्येदेखील फरांदे यांना मोठी आघाडी मिळाल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला. सिडकोत तर सर्वाधिक उमेदवार असल्याने त्याठिकाणी सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवारांचे कार्यकर्ते जमले होते. मात्र अंतिमरीत्या सीमा हिरे आणि अपूर्व हिरे यांच्यातच लढत होत असल्याचे दिसल्यानंतर मनसेचे दिलीप दातीर आणि शिवसेना पुरस्कृत बंडखोर विलास शिंदे यांचे उमेदवार निघून गेले.
नाशिक शहरात नियोजनपूर्वक मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 1:31 AM