नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणाच्या पडीत जागेत पाटबंधारे विभाग व माजी सैनिक किसन निवृत्ती सहाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन माध्यमिक विद्या मंदिर साकुर यांच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहिमेचा कार्यक्र म राबविण्यात आला. जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाचा ºहास अशा गंभीर समस्यांनी आज आपल्या सर्वांना ग्रासले आहे. वाढत्या प्रदुषणामुळे सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. सजीवसृष्टीपुढील हे संकट दूर करणे हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. प्रदुषणाला आळा घालून पर्यावरणाचे, निसर्गाचे संवर्धन करणे काळाची गरज बनली असून हे आपले आद्य कर्तव्य आहे, या भावनेतून सर्वांनीच निसर्ग रक्षणाच्या या चळवळीत सहभागी झाले पाहिजे, असे मत नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन वनविभाग यांच्या वतीने ३३ कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्टे हाती घेण्यात आले असून त्या पाशर््वभूमीवर ब्रिटिशकालीन दारणा धरण येथे साकुर येथील माजी सैनिक किसन निवृत्ती सहाणे यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.या वृक्षारोपण मोहिमेप्रसंगी उपविभागिय अभियंता प्रमोद कुलकर्णी, दारणा धरणाचे शाखा अभियंता सुहास पाटील, संदीप मते, मुख्याध्यापक प्रवीण रोकडे, सारु क्ते, साळी, भाऊसाहेब कडभाने, साकुरचे सरपंच बाळू आवारी, तुकाराम सहाणे, सुनिल सहाणे, संजय सहाणे, अशोक सहाणे, सचिन सहाणे, समाधान सहाणे, सोमनाथ सहाणे, अनिल उन्हवणे, शिवाजी सहाणे, वृक्षप्रेमी नंदिनी दुबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ब्रिटिशकालीन दारणा धरण परिसरात वृक्षारोपण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 3:52 PM