नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथे कृषी दिनानिमित्त कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या बंधावर वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्र मात परिसरातील शेतकºयांच्या बांधावर वृक्षारोपण करण्यात आले. गावात अनेक ठिकाणी वृक्षारोपण आणि वृक्षांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पिक कर्जासाठी लागणारे कागदपत्र व शासनामार्फत राबवण्यात येणाºया योजनेसंदर्भात युनियन बँंकेचे व्यवस्थापक योगेश पाटील व कृषी सहाय्यक कीर्ती कळसकर यांनी पिक विमा संदर्भात शेतकºयांना माहिती दिली.यावेळी सरपंच शशिकांत पाटील, शाखा प्रबंधक शेलार, अर्जुन बर्डे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे, सिन्नर तालुका कृषी पदवीधर युवाशक्तीचे अध्यक्ष मयूर कातकाडे, तसेच संघटनेचे सदस्य हिंदुराव पानसरे, निवृत्ती बोडके ,कृष्णा तांबे, दिनकर उघाडे वा ग्रामस्थ उपस्थित होते. सिन्नर वन अधिकारी सोनवणे,साळवे यांनी वृक्षारोपणासाठी वृक्ष उपलब्ध करून देत मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांच्या बंधावर वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 5:09 PM
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथे कृषी दिनानिमित्त कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या बंधावर वृक्षारोपण करण्यात आले.
ठळक मुद्देसिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथे कृषी दिनानिमित्त कार्यक्रम