खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील रस्ते खड्ड्यात गेल्याने चालताना कसरत करावी लागते. त्यामुळे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व रस्त्याचे काम तत्काळ करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शिंदवड येथील ग्रामस्थांनी रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन केले.खेडगाव - वडनेर भैरव, खेडगाव -शिंदवड आदी रस्ते खड्डेमय असून, शेतीमाल बाजारात नेताना गैरसोयीचा सामना करावा लागतो. तसेच वाहनांचे पार्ट्स खराब होणे, रु ग्ण नेतांना अनेक अडचणी येतात. तसेच गावातील फरशीवरून दोन वर्षापूर्वी एक व्यक्ती वाहून गेला होता. त्यानंतर सर्व आजी माजी सर्व नेत्यांनी व बांधकाम विभागाने पाहणी केली आश्वासने दिली. पण अद्याप फरशाची उंची व रस्त्याची कामे होत नसल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलन केले.यावेळी गोविंद आहेर, बापू बस्ते, चिंधू बस्ते, दत्तात्रेय पवार, सोपान बस्ते, अनिल बस्ते, श्रीकांत बस्ते, राहुल बस्ते आदी उपस्थित होते. अनेक वर्ष होऊनही रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नाहीत. केवळ रस्त्यांची पाहणी करता लवकरच रस्ता होईल, अशी माहिती मिळते. पण कार्यवाही होत नाही. सद्यस्थितीत रस्त्याची चाळण झाली असून, बांधकाम विभाग आता तरी उपाययोजना करणार काय, याकडे लक्ष लागले आहे.- सोपान बस्ते, शिंदवड ग्रामस्थ
काम होत नसल्याने खड्ड्यात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 12:28 AM
खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील पूर्व भागातील रस्ते खड्ड्यात गेल्याने चालताना कसरत करावी लागते. त्यामुळे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व रस्त्याचे काम तत्काळ करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील शिंदवड येथील ग्रामस्थांनी रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन केले.
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष । शिंदवड येथील ग्रामस्थांचे आंदोलन