विद्यालयाच्या वृक्षलागवड व संवर्धन विभागाच्या वतीने दत्तक झाड नियोजन करण्यात आले असून, शिक्षक व विद्यार्थ्यांना एक कडुलिंबाचे रोपटे दत्तक देऊन संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वतःहून स्वीकारली
आहे. स्कूल कमिटी चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, व्ही.एस. काटकर यांनीदेखील एक रोप संवर्धनाची हमी दिली. वृक्षारोपणाचा प्रारंभ प्राचार्य सी. व्ही. खेलुकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक एस.के. सोमासे, डी.के. सोनवणे, एम.पी. चौधरी, जे.के. भोई, एस.बी. निकम, एम.पी. सोनवणे, के.डी. खैरनार, श्रीमती एम.एस. बोरसे, बी.जे. बोरसे, व्ही.पी. जाधव, ए.यू, माळी, जे.ए. बोरसे, एस.बी. बोरसे, पी.व्ही. खेताडे, जे.के. चौरे, वाय.एम. चौधरी, जे.एस. आहेर, यू.एल. वळवी, जे.डी. वाघेरे, शैलेश शिंदे, सुरेश जगदाळे, वाय.डी. कानडे, राहुल जाधव तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.