त्र्यंबकेश्वर : जलपरिषद मित्र परिवाराच्यावतीने त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी तसेच सुरगाणा तालुक्यात जलपरिषद मिशन ११११ वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात ५००हून अधिक वृक्षांची ग्रामस्थांच्या श्रमदानातून लागवड करण्यात आली. यामुळे या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत विविध जातीच्या वृक्षांच्या लागवडीबरोबर शेतकरी केशर आंबा, चिकू, काजू यांसारख्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करीत आहे. गावठा येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश लहारे यांनी आपल्या शेतात केशर जातीच्या दोनशेहून अधिक आंब्यांची लागवड करून जलपरिषद मित्र परिवाराच्या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. याप्रसंगी देविदास कामडी, विठ्ठल लहारे, विलास लहारे, केशव लहारे, अनिल बोरसे, रमाकांत लहारे, नामदेव आंबेकर, हुशार हिरकुड, केशव पवार, अशोक तांदळे, प्रकाश पवार, विठ्ठल मौळे आदींसह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.
जलपरिषदेच्या मोहिमेत ५०० रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:11 AM