सिन्नर : प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये विम्याच्या रकमा भरूनही विमा कंपनीकडून अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार पंचाळे येथील डाळींब उत्पादक शेतकरी शांताराम थोरात यांनी केली. विमा कंपनीच्या कार्यपध्दतीविरोधात ठाकरे यांची भेट घेणार त्यांना साकडे घालणारे असल्याचे पंचाळे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.थोरात यांनी एक हेक्टर तीन गुंठे डाळिंब पिकाच्या क्षेत्रासाठी ७ हजार ८६५ रकमेचा पीकविमा रक्कम महाराष्टÑ बॅँकेच्या वडांगळी शाखेमार्फत मागील वर्षाच्या आॅक्टोबर महिन्यात भरणा केला होता. यावर्षी शासनाने दुष्काळ जाहिर केला आहे. पंचाळे परिसरात टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शासन नियमाप्रमाणे दुष्काळ जाहीर होवूनही व पाण्याअभावी पिके जळाली तरी विमा कंपन्यांनी अद्यापही भरपाई दिली नाही. थोरात यांनी डाळिंब बागेच्या विम्यापोटी मिळणारी संरक्षित रक्कम १ लाख ५७ हजार ३०० रूपयांची नुकसान भरपाई सदर विमा कंपनीकडून मिळणे अपेक्षित आहे. त्यांनी त्यासंदर्भात विमा कंपनीकडे संपर्क करूनही कंपनीने भरपाईबाबत कुठलेही ठोस पुरावे दिले नाही. शासनाने यात हस्तक्षेप करून कंपन्यांना याबाबत आदेश देवून मला व माझ्यासमवेत ज्या शेकऱ्यांनी विमा भरला आहे त्यांना त्वरीत भरपाई द्यावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे. याबाबत येत्या आठवड्याभरात निर्णय न झाल्यास आपण व इतर शेतकरी पंचाळे गावापासून मुंबई पर्यंत पदयात्रा काढून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गाºहाणे मांडणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
पीकविमा भरपाईसाठी शेतकरी घालणारे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 5:43 PM