एकलहरे : येथील नाशिक औष्णिक विद्युत केंद्र परिसरात ह्यपिस पार्कह्ण उद्यानामुळे एकलहरे वसाहतीत आबालवृद्धांसाठी विविध प्रकारची खेळणी, व्यायाम, जॉगिंग, योगा, सेल्फी पॉइंट आदी सुविधांयुक्त अशा उद्यानामुळे वसाहतीच्या सौंदर्यात भर पडली आहे. विशेष म्हणजे जपानच्या धर्तीवर ‘मियावाकी’ पद्धतीचा उपयोग करून या ठिकाणी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आल्याने त्यातून आरोग्य संवर्धनाला मोठा हातभार लागत आहे.एकलहरे वीज केंद्राच्या परिसरात प्रत्येक विभागात छोटी-मोठी उद्याने तयार करून त्यांच्या देखभालीची जबाबदारी त्या त्या विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आल्याने उद्यांनाना बहर आला आहे. या ठिकाणी जपानी पद्धतीचा वापर करून ‘मियावाकी’ उद्यानाची निर्मिती करण्यासाठी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी प्रयत्न केले. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वृक्षलागवड करण्यात येत आहे. प्रशासकीय इमारतीच्या बाजूला ह्यमियावाकीह्ण पद्धतीने उद्यानाच्या निर्मितीसाठी याठिकाणी २ बाय २ फूट अंतरावर वृक्षलागवड केली जाते. त्यात झाडांची वाढ दहा पट जलद होते. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या झाडांच्या स्थानिक प्रजाती लावता येतात. नेहमीपेक्षा तीस पट घनदाट जंगल तयार होते. या झाडांमुळे ३० टक्क्यांपर्यंत कार्बनडाय आॅक्साइड वायू शोषून घेण्यास त्यामुळे मदत होते. दोन वर्षांनंतर झाडांची निगा घ्यावी लागत नाही. हे जंगल आवाज व धुलीकणास रोध निर्माण करते. या जंगलातून विविध पक्षी व फुलपाखरांना आश्रयस्थान निर्माण होते. सुरुवात मोहगणीच्या वृक्षाची लागवड करून करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता मनोहर तायडे, ठेकेदार सतीश पाटील, साहेबराव शिंदे, संजय कुटे, संजय चव्हाण, विनोद मोरे आदी उपस्थित होते.दीडशे प्रकारची झाडेमियावाकी पद्धतीच्या वृक्षलागवडीसाठी बेल, सत्यपर्णी, रामफळ, फणस, निम, अशोका, आपटा, कांचन, पळस, सिसम, पायरी, वड, पिंपळ, अर्जुन, आंबा, खैर, कामिनी, कदंब, जांभूळ, आवळा, करंज, रिठा, चिंच, हिरडा, बेहडा, बकुळ आदी दीडशे प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यात येत आहे.
‘मियावाकी’ पद्धतीने झाडे लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:01 AM