त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम करून चार वर्षे पूर्ण झाली आहेत. आता पाचव्या वर्षात इमारतीची वाटचाल सुरू आहे. तथापि अजूनही इमारत उद्घाटनाअभावी झाडे-झुडपात आपला वापर केव्हा सुरू होईल याची वाट पाहात दिवस कंठीत आहे.महाराष्ट्रात ज्या ज्या तालुक्यांचे विभाजन होऊन नवीन तालुके निर्माण केले गेले त्यापैकी त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी तहसील कार्यालयाच्या इमारतीचा समावेश आहे. तहसीलदार कार्यालय सध्या त्र्यंबकला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनुदानातून बांधून मिळालेल्या बचत भवनच्या इमारतीत कार्यरत आहे. काही महिने नगरभूमापन अधिकाऱ्यांच्या इमारतीतदेखील सुरू होते. त्यानंतर ज्यांचे कार्यालय होते त्या नगरभूमापनच्या अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय खाली करून घेतले अणि स्वत:चे कार्यालय थाटले. तहसीलदार कार्यालय पुनश्च बचत भवन येथे कार्यरत आहे.
इमारत उद्घाटनाअभावी झाडे-झुडपात
By admin | Published: October 08, 2014 12:14 AM