महाविद्यालयातील तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागामध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी संघर्ष केदू आहेर याचे वडील केदू हरीभाऊ आहेर व आजोबा हरीभाऊ मालजी आहेर (रा. वराडी, तालुका चांदवड) या रुग्णांना बी पॉझिटिव्ह प्लाझ्माची तातडीची गरज होती. ही बाब महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागातील प्रा. अंकित गुजराथी व प्रा. किरण गोरे यांना कळताच त्यांनी मालेगावहून नाशिक येथे जावून प्लाझ्मादान केले. याबद्दल संस्थेने प्रा. अंकित गुजराथी व प्रा. किरण गोरे यांचे कौतुक केले.
---------------------------------------------------
चांदवडला ७९ नवीन बाधित रुग्ण
चांदवड : शहरात ७९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण चांदवड शहरातील असून, तालुक्यातील आसरखेडे, भयाळे, भोयेगाव, धोंडबा, हट्टी, कळमदरे, परसुल, शिंगवे, तीसगाव, वडाळीभोई, बहादुरी, भाटगाव, भुत्याणे, दरेगाव, हिरापूर, कानडगाव, मेसनखेडे खुर्द, निमोण, वडनेरभैरव, कानमंडाळे, खडकओझर, दिघवद, वाकी, विटावे, वागदर्डी आदी भागातही रुग्ण आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.