नाशिक : दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर महापालिकेने दुसºया दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवत २७ जणांकडून १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्याच दिवशी ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल केल्यानंतर दुसºया दिवशी रविवारमुळे अनेक दुकाने बंद असतानाही प्लॅस्टिक वापरणाºयां-ंविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. मनपाने प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी धडाक्यात सुरू केली असून, रविवारी पूर्व विभागातील ६ जणांविरु द्ध कारवाई करीत ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर पश्चिम विभागात २ जणांविरु द्ध केलेल्या १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सिडकोमध्ये ७ जणांविरु द्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३५ हजार रुपयांच्या दंडाची वसुली झाली. नाशिकरोड विभागात ४ जणांविरु द्ध कारवाई करून २० हजार रुपयांच्या दंडाची वसुली झाली असून, सातपूरमधून ५ जणांविरु द्ध केलेल्या कारवाईतून २५ हजार तर पंचवटी विभागातील तिघांवर केलेल्या कारवाईत १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना यश आले असून, रविवारी संपूर्ण दिवसभरात महापालिकेच्या हद्दीत २७ जणांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईतून १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही रक्कम प्लॅस्टिकबंदीच्या पहिल्या दिवशी केलेल्या कारवाईतून वसूल दंडाच्या निम्मीच आहे. परंतु दुसºया दिवशी रविवार असल्यामुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने बंद होती. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशीच्या कारवाईचा अनेक व्यापाºयांनी धसका घेत त्यांच्या दुकानांमधील प्लॅस्टिक शनिवारी दिवसा व रात्रीही जागरण करून हटविल्याने रविवारच्या कारवाईत तुलनेत दंडाची वसुली कमी झाली असली तरी प्लॅस्टिकचा वापर करणाºयांवर मात्र पुरती जरब बसल्याचे दिसून आले.
प्लॅस्टिक बंदी: दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:46 AM