नाशिक : शासनाच्या अनुदानाच्या भरवशावर शेततळे करणाऱ्या शेतकऱ्यांकडून जुलै ते सप्टेंबर याकाळात तळ्यात प्लॅस्टिक टाकले जाते, परंतु कृषी विभागाकडून अशा शेतकºयांना अनुदान दिले जात नसल्याने ज्या ज्या शेतकºयांनी शेततळ्यात प्लॅस्टिक टाकले आहे त्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.बनकर यांनी म्हटले आहे, येवला तालुक्यातील कृषि विभागांतर्गत साधारणत: दोन हजार शेतकरीबांधवांनी शेततळे कागदासाठी अर्ज केलेले असून, कांदा चाळीसाठी साडेतीन हजार अर्ज भरलेले आहेत. असे असतानाही शेततळ्याचे अनुदान फक्त तीनशे शेतकºयांना मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित शेतकºयांना अनुदान मिळण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. प्लास्टिकमुळे शेततळ्याचे पाणी शेतकºयांना जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत पुरते. परंतु कृषी खात्याकडून जोपर्यंत शेततळ्याला मंजुरी दिली जात नाही तोपर्यंत शेततळ्यात प्लॅस्टिक टाकू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.असाच प्रकार कांदाचाळींच्या बाबतीत झाला आहे. एकट्या येवला तालुक्यातील साडेतीन हजार शेतकºयांनी त्यासाठी अर्ज केलेले असून, येवला तालुक्यासाठी फक्त ४८० कांदाचाळ मंजूर झालेल्या आहेत. यावर्षी कांदा पिकास चांगला भाव मिळाल्याने व उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरीवर्गाचा कांदाचाळ बांधण्याकडे कल वाढलेला आहे.
प्लॅस्टिकयुक्त शेततळी अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:41 AM
नाशिक : शासनाच्या अनुदानाच्या भरवशावर शेततळे करणाऱ्या शेतकऱ्यांकडून जुलै ते सप्टेंबर याकाळात तळ्यात प्लॅस्टिक टाकले जाते, परंतु कृषी विभागाकडून ...
ठळक मुद्देशासनाच्या अनुदानाच्या भरवशावर शेततळे करणाऱ्या शेतकऱ्यांकडून जुलै ते सप्टेंबर याकाळात तळ्यात प्लॅस्टिक टाकले जाते, परंतु कृषी विभागाकडून अशा शेतकºयांना अनुदान दिले जात नसल्याने ज्या ज्या शेतकºयांनी शेततळ्यात प्लॅस्टिक टाकले आहे त्यांना अनुदान देण्यात यावे,