नांदूरवैद्य : स्वच्छ भारत अभियानानंतर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्त अभियान सुरु राबविण्यासाठी येत्या २ आॅक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं जयंती आहे. या निमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथील सरपंच उषा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.नांदूरवैद्य येथे पार पडलेल्या या प्लास्टिकमुक्त अभियान विशेष ग्रामसभेत सुरु वातीस ग्रामअधिकारी किरण शेलावणे यांनी ग्रामस्थांना या विशेष ग्रामसभेविषयीचे पत्रक वाचून दाखवले. यांनतर गावामध्ये विशेष स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण गावामध्ये प्लास्टिक बंदीचा ठराव येत्या महात्मा गांधी जयंतीदिनी करण्यात येईल असे यावेळी सांगितले.यावेळी ग्रामस्थांनी सरपंच उषा रोकडे यांच्याकडे प्रत्येक कुटुंबास एक डस्टबीन व घंटागाडीची व्यवस्था केल्यास गावात अस्वच्छता होणार नाही व गावात आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल अशी मागणी केली.चौकट....काही नागरिकांनी गावातील विविध समस्यांवर आवाज उठविण्यास सुरु वात केल्यानंतर ग्राम अधिकारी शेलावणे यांनी ग्रामस्थांना सांगितले की, की ही फक्त प्लास्टिकमुक्त अभियानाविषयी तातडीने बोलावण्यात आलेली विशेष ग्रामसभा असून गावातील समस्यांवर २ आॅक्टोंबरला होणाऱ्या ग्रामसभेमध्ये चर्चा करु न त्या समस्यांचे निरसन केले जाईल असा बचावात्मक पविञा घेत ग्रामस्थांना शांत केले.त्यानंतर प्लास्टिक बंदीवर विविध उपाययोजना करण्यासाठी सरपंच व ग्रामस्थांमध्ये चर्चा करण्यात आली.याप्रसंगी उपसरपंच पोपटराव दिवटे, ग्रामपंचायत सदस्य केशव डोळस, नितीन काजळे, अॅड चंद्रसेन रोकडे, पंढरीनाथ मुसळे, गणेश मुसळे, कुंडलिक मुसळे, भाऊसाहेब मुसळे, रोहिदास सायखेडे, रामकृष्ण दवते, मारूती डोळस, माधव कर्पे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.गावामध्ये प्लास्टिक बंदी लागू करण्यापेक्षा शासनाने प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन करणारे कारखाने आधी बंद करावे.यामुळे ख-या अर्थाने प्लास्टिकमुक्त अभियान यशस्वी होऊन गावामध्ये स्वच्छता व आरोग्य सूरिक्षत राहण्यास मदत होईल.व आपोआपच प्लास्टिकमुक्त गाव होण्यास चालना मिळेल.- पंढरीनाथ मुसळे. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते.
नांदूरवैद्य येथे प्लास्टिकमुक्त अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 6:48 PM
नांदूरवैद्य : स्वच्छ भारत अभियानानंतर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्त अभियान सुरु राबविण्यासाठी येत्या २ आॅक्टोंबरला राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचं जयंती आहे. या निमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूरवैद्य येथील सरपंच उषा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देस्वच्छता राखण्यासाठी डस्टबीन, घंटागाडीची ग्रामस्थांची मागणी