एकलहरे : येथील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एल. अलगट होते.प्रमुख पाहुणे म्हणून एकलहरे वीज केंद्राचे मुख्य अभियंता उमाकांत निखारे, माजी सरपंच राजाराम धनवटे, कार्यकारी अभियंता सूर्यकांत पवार, जयश्री गोरे, रजनी गिते, शोभा पाटील, लीना पाटील, आसाराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांना ‘स्वच्छतादूत’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन डी. एस. सानप यांनी केले. आभार एस. के. ढाकणे यांनी मानले. कार्यक्रमास एस. एम. सानप, व्ही. डी. बोडके, बी. जी. गिते, टी. ई. दराडे, एम. के. वाघ यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
एकलहरे विद्यालयात प्लॅस्टिकमुक्त अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:04 AM