नाशिक : उघड्यावर पडलेल्या प्लस्टिकच्या कचऱ्यामुळे जनावरांचा तसेच नदी व समुद्रातील प्लॅस्टिकमुळे जलचर मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साठीच जनजागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचतर्फे सोमवारी (दि. ९) व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या प्राणंगणात ५५ फुट लांब व २० फुट उंच अशा व्हेल माशाची प्रतिकृती साकारुन त्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे रॅपर व इत्यादी घातक प्लॅस्टिक लटकविण्यात आले होते. प्लास्टिकमधील धोकादायक रसायने पाण्यात मिसळल्याने तसेच जलचरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आधी या प्लॅस्टिकमुळे लहान मासांचा मृत्यू होत होता. मात्र आत भव्य अशा व्हेल मासाही मरण पावत असल्याचे चित्र आहे. यासाठी जनजागृती व्हावी यासाठी मंचतर्फे व्हेल माशाची भव्य प्रतिकृती साकारली होती. यावर विविध प्लास्टिकचे रॅपर चिपकवून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘से नो टू प्लॅस्टिकविषयी मार्गदर्शन क रण्यात आले. यात मुलांनी युज अॅँड थ्रो पेन ऐवजी शाईचा पेन वापरावा, प्लास्टिकच्या बाटली ऐवजी स्टिलची बाटली वापरावी, सिंगल यूज प्लॉस्टिक वापरु नये आदींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘प्लस्टिक बंदीवर’ पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी प्लॉस्टिक न वापरण्याविषयी विविध संदेश चित्रातून देण्यात आले. यावेळी मंचचे अध्यक्ष जगबीर सिंग, यश भामरे, आकाश पटेल, जडिया शेख, पराग चौधरी, विकास ठाकरे, पंकज जोशी, पुष्पा ढापोला, संगिता शर्मा, प्रिती जोशी आदी उपस्थित होते.प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ºहास होत आहे. समुद्रातील प्लॅस्टिच्या कचºयामुळे सध्या भव्य असा व्हेल मासाही मृत्युमुखी पडत असून लहान माशांचे प्रमाण तर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामूळे लोकांमध्ये प्लॅस्टिक न वापरण्यावर जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. नागरिकांनीही यासाठी स्वत:हून प्रयत्न करणे आवश्यक आहे.जगबीर सिंग, अध्यक्ष, मानव उत्थान मंच
माशाच्या प्रतिकृतीतून दिला प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 3:10 PM
जनजागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचतर्फे ५५ फुट लांब व २० फुट रुंद अशा व्हेल माशाची प्रतिकृती साकारुन त्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे रॅपर व इत्यादी घातक प्लॅस्टिक लटकविण्यात आले होते
ठळक मुद्दे५५ फुट लांब व २० फुट रुंद अशा व्हेल माशाची प्रतिकृतीप्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थाचे रॅपर व इत्यादी घातक प्लॅस्टिक लटकविण्यात आले जलचरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे