नाशिक : उघड्यावर पडलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे जनावरांचा तसेच नदी व समुद्रातील प्लॅस्टिकमुळे जलचर मृत्युमुखी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या साठीच जनजागृती करण्यासाठी मानव उत्थान मंचतर्फे सोमवारी (दि. ९) व्ही. एन. नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात ५५ फूट लांब व २० फुट रुंद अशा व्हेल माशाची प्रतिकृती साकारून त्यावर प्लॅस्टिकच्या बाटल्या, रॅपर व इत्यादी घातक प्लॅस्टिक लटकविण्यात आले होते.प्लॅस्टिकमधील धोकादायक रसायने पाण्यात मिसळल्याने तसेच जलचरांच्या पोटात गेल्याने त्यांचा मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आधी या प्लॅस्टिकमुळे माशांचा मृत्यू होत होता. यासाठी जनजागृती व्हावी यासाठी मंचतर्फे व्हेल माशाची प्रतिकृती साकारली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘प्लॅस्टिक बंदीवर’ पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. यावेळी मंचचे अध्यक्ष जगबीर सिंग, यश भामरे, आकाश पटेल, जडिया शेख, पुष्पा ढापोला, संगीता शर्मा, प्रिती जोशी आदी उपस्थित होते.प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ºहास होत आहे. समुद्रातील प्लॅस्टिच्या कचºयामुळे सध्या भव्य असा व्हेल मासाही मृत्युमुखी पडत असून, लहान माशांचे प्रमाण तर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामूळे लोकांमध्ये प्लॅस्टिक न वापरण्यावर जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. नागरिकांनीही यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.- जगबीर सिंग, अध्यक्ष, मानव उत्थान मंच
‘प्लॅस्टिकमुक्ती’चा दिला संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:57 AM