महानिर्मिती राज्य नाट्य स्पर्धानाशिक : सिनेमा असो अथवा व्यावसायिक नाटक. अभिनय क्षेत्रात यशप्राप्तीसाठी कलाकाराचा पाया पक्का असणे गरजेचे आहे. विविध नाट्य स्पर्धा आणि प्रायोगिक नाटकांतून कलाकाराला त्याच्या कलेचा पाया भक्कम करण्यास मोठी मदत होत असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री मृणाल दुसानीस यांनी केले. नाशिक औष्णिक विद्युत केंद्रातर्फे कालिदास कलामंदिर येथे महानिर्मिती कंपनीच्या आंतर विद्युत केंद्र नाट्य स्पर्धेचे दुसानीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्यासह व्यासपीठावर सौरऊर्जा मुख्य अभियंता नवनाथ शिंदे, सुनील इंगळे, देवेंद्र मशाळकर, राकेश कमटमकर, शशांक चव्हाण, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत वाघमारे आदी उपस्थित होते. विद्युत केंद्र एकलहरेच्या रश्मी काळोखे लिखित ‘चौकशी’ नाटकाने स्पर्धेस प्रारंभ झाला. नाटकाच्या केंद्रस्थानी आयुष्यात वारंवार होणाऱ्या विविध चौकशांचा सामना करणाºया ‘पारी’चे पात्र आहे. चौकशीच्या माध्यमातून शासकीय कार्यप्रणालीतील त्रुटी, त्यावरील समाज शक्तीचा प्रभाव, काही लोकांच्या हितासाठी घडवून आणल्या जाणाºया तसेच दप्तरजमा केल्या जाणाºया चौकशीच्या घटना, महिलेचा कौटुंबिक छळ, मन हेलावून टाकणाºया घटना अशा विविध वास्तवावर या नाटकाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. सुनील सुळेकर, प्रवीण मोरे, नितीन शेटे, मनोज माळवे, ज्योती चंद्रमोरे, प्राजक्ता मल्हारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शन विजय रावळ, नेपथ्य गुलाब पवार, संगीत नागेश पद्मन, रंगभूषा व वेशभूषा ज्योती चंद्रात्रे यांनी केले आहे. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यात अनिल मुसळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जयश्री गोरे यांनी केले. आभार निवृत्ती कोंडावले यांनी मानले.आजचे नाटक- नाटक : ४७ एके ४७, वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी १.००, नाटक : दि गेम आॅफ डेस्टिनी, वेळ : दुपारी ४.०० ते सायं : ७.००,
अभिनय क्षेत्रात यशासाठी नाटकाचा पाया महत्त्वाचा : मृणाल दुसानीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:57 AM