सुरगाणा : उंबरठाण एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा सुरज लक्ष्मण खोटरेची निवड दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये झाली आहे. 19वर्षाखालील क्र ॉसकंट्री 5 किलोमीटर स्पर्धा प्रकारात दिल्ली येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुरज महाराष्ट्र संघातर्फे खेळणार आहे.सातारा जिल्ह्यातील कराड येथे झालेल्या राज्यस्तरीय क्र ॉसकंट्री 5 किलोमीटर स्पर्धेमध्ये सुरजने विशेष प्राविण्यासह महाराष्ट्र संघात आपली जागा पक्की केली होती. सप्टेंबर मिहन्यात झालेल्या कराड सदगुरू मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुरजने सुवर्ण पदक पटकावले होते. कराड येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय सुरजने कास्य पदक पटकावले आहे.सूरज हा तालुक्यातील उंबरठाण येथील रिहवाशी आहे. त्याच्या उत्कृष्ट कामिगरीमुळे सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्तांनी त्याला उंबरठाण एक्सप्रेस असे नाव दिले आहे. सुरज हा भविष्यात खूप मोठा खेळाडू बनेल असा विश्वास त्याचे मार्गदर्शक विजय पवार, वडील लक्ष्मन खोटरे, प्राथ. शिक्षक सतीश इंगळे यांनी व्यक्त केला आहे.
उंबरठाणचा खेळाडू धावणार दिल्लीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 6:13 PM