नाशिक : जागतिक पालीभाषा गौरव दिनानिमित्त संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १५) सकाळी १0.३0 वाजता प. सा. नाट्यगृहात पाली-मराठी भाषेतील भिक्खुनी महाप्रजापती गौतमी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले.अनागरिक धम्मपाल यांचा जन्मदिन (दि. १७ सप्टेंबर) हा पालीभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या दिवसाचे औचित्य साधून गौतम बुद्धांच्या जीवनावरील नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. या नाटिकेत युवराज सिद्धार्थ यांनी गृहत्याग केल्यानंतर बोधी प्राप्त करून तथागत गौतम बुद्ध झाल्यावर प्रथमच कपिलवस्तू नगरीत भिक्षा (पिंडाचार) मागत येतात. तसेच बुद्धांनी महिला भिक्खुंनी संघाला परवानगी कशी दिली अशा अतिशय सुबक व सुलभ विविध प्रसंगांचे नाटिकेत सादरीकरण करण्यात आले. नाटिकेचे लेखन माधव सोनावणे यांनी केले असून, दिग्दर्शन प्रशांत हिरे यांनी केले. या नाटिकेत दिलीप काळे, भूषण गायकवाड, डॉ. सोनाली कुलकर्णी, मृणाल निळे, भावना शिंदे, मनीषा अक्कर, प्रबुद्ध खरे, किरण पाटील, कोमल ढोले आदिंच्या प्रमुख भूमिका आहेत. तर गौतम बुद्धांची भूमिका सचिन चव्हाण यांनी साकारली आहे.
बुद्धांच्या जीवनावर पालीभाषेत नाटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 1:17 AM
जागतिक पालीभाषा गौरव दिनानिमित्त संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १५) सकाळी १0.३0 वाजता प. सा. नाट्यगृहात पाली-मराठी भाषेतील भिक्खुनी महाप्रजापती गौतमी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले.
ठळक मुद्देपालीभाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम