नाशिक : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मॉल बंद, बाजारपेठा बंद, उद्यानांपासून सारेच व्यवसाय बंद. मंदिरेही बंद. परंतु जिवाची जोखीम पत्करून या आपत्कालात डॉक्टरांपासून वैद्यकीय क्षेत्रातील सारे कर्मचारी लढत आहेत ते सामान्य नागरिकांसाठी! त्यामुळे त्यांनी‘रोगाचा मुकाबला करण्यासाठी घरीच राहा’, असा संदेश दिला आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करीत असून, जिल्हा शासकीय रुग्णालय आणि अन्य शासकीय रुग्णालये प्रसंगी खासगी रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय आणि रुग्णवाहिका चालकदेखील प्रत्येक संशयित रुग्णासाठी धावपळ करताना दिसत आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकदेखील आपातस्थितीत मुकाबला करण्यासाठी सज्ज आहेत. कारण प्रसंगी खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्यात येणार असून, खासगी रुग्णांचीदेखील मदत घेतली जाणार आहे. शहरात कोणत्याही प्रकारे संसर्ग होऊ नये यासाठी ते जीवापाड प्रयत्न करीत आहेत. अशा स्थितीत सामान्य नागरिकांसाठी रुग्णालयात लढणाऱ्या या वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकच अपेक्षा आहे. आम्ही तुमच्यासाठी येथे (रुग्णालयात) आहोत. परंतु तुम्ही आमच्यासाठी एकच करा, ते म्हणजे घरातच राहा.आपत्कालीन परिस्थितीत शाळा, महाविद्यालये, मॉल, दुकाने, बाजारपेठा, मैदाने, तरण तलाव हे सारेच बंद आहे ते केवळ गर्दी होऊ नये आणि एक दुसºयाच्या संपर्कात आल्यानंतर चुकून एखादा रुग्ण असेलच तर त्यामुळे दुसरा रुग्ण वाढू नये यासाठी ! किमान ३१ मार्चपर्यंत हे पथ्य पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्लीज स्टे होम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 1:12 AM
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मॉल बंद, बाजारपेठा बंद, उद्यानांपासून सारेच व्यवसाय बंद. मंदिरेही बंद. परंतु जिवाची जोखीम पत्करून या आपत्कालात डॉक्टरांपासून वैद्यकीय क्षेत्रातील सारे कर्मचारी लढत आहेत ते सामान्य नागरिकांसाठी! त्यामुळे त्यांनी ‘रोगाचा मुकाबला करण्यासाठी घरीच राहा’, असा संदेश दिला आहे.
ठळक मुद्देलढ्यासाठी : कोरोनाच्या विरोधात वैद्यकीय क्षेत्राचे आवाहन