शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सुख-समृध्दीची मनोकामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 7:02 PM

नागरिकांनी ‘हे लक्ष्मी तू सर्व देव-देवतांना वर देणारी व विष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो, अशी प्रार्थना केली. यावेळी लक्ष्मीच्या मूर्तीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले होते.

ठळक मुद्देलक्ष्मीपूजन करुन दीपोत्सवाचा जल्लोषआकशकंदील-दिवाळीचे अतुट नाते

नाशिक : आश्विन वद्य अमावस्येच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लक्ष्मीपूजन करुन दीपोत्सवाचा जल्लोष केला. बुधवारी (दि.७) संध्याकाळी पहिला मुहूर्तापासून रात्री अखेरच्या मुहूर्तापर्यंत नागरिकांनी घरे, दुकानांमध्ये पारंपरिक पध्दतीने लक्ष्मीचे पूजन करुन सुख-समृध्दीची मनोकामना केली. आपल्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराची भेट घेऊन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्यादीपोत्सवाचा प्रारंभ तसा वसुबारसपासून होतो. वसूबारस ते भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. धनत्रयोदशी, नरक चर्तुदशी साजरी केल्यानंतर बुधवारी पहाटे नाशिककरांनी अभ्यंगस्नान करत देवपूजा आटोपली.आश्विन वद्य अमावस्येची समाप्ती बुधवारी रात्री साडे नऊ वाजता झाली. तत्पुर्वी संध्याकाळी ठिकठिकाणी शहरासह उपनगरांमध्ये लक्ष्मीपूजनाची लगबग होती. घरे दुकानांपुढे स्वच्छता करुन महिलावर्ग रांगोळी काढण्यात दंग होता तर पुरूष वर्गाकडून आकर्षक सजावट केली जात होती. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले उमटविण्यात आली तर घरे, दुकानांच्या द्वारावर झेंडूची तोरण लावण्यात आली. तसेच लक्ष्मीपूजनाप्रसंगी लाह्या, बत्तासेचा प्रसाद वाटप करण्यात आला. तसेच सुहासिनींकडून घरातील वाहनांचेही औंक्षण करण्यात आले. तसेच दागदागिण्यांची पूजा करण्यात आली. संध्याकाळी पावणेसातचा मुहूर्तावर शहरातील व्यावसायिकांकडून शरणपूररोड, कॉलेजरोड, मेनरोड, शालिमार, गंगापूररोड आदि भागात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दिवसभरात लक्ष्मी, कुबेर, विष्णू आदि देवतांचा पूजाविधी पार पडला. चौरंगावर अक्षदांचे अष्टदल कमल किंवा स्वास्तिकाचे चिन्ह काढत त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. तसेच नागरिकांनी ‘हे लक्ष्मी तू सर्व देव-देवतांना वर देणारी व विष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो, अशी प्रार्थना केली. यावेळी लक्ष्मीच्या मूर्तीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले होते. कुबेराकडेही धनप्राप्तीची प्रार्थना करत गायीच्या दूधापासून तयार करण्यात आलेला खव्याचा नैवेद्यासह धने, गुळ, साळीच्या लाह्या, बत्तासे आदिंचा प्रसाद लक्ष्मीला अर्पण करण्यात आला.आकशकंदील-दिवाळीचे अतुट नातेफटाका आणि दीपोत्सव असे समीकरण जोडण्याऐवजी आकाशकंदील आणि दिवाळीचे अतुट नाते नागरिकांनी लक्षात घेत घरोघरी तसे दुकानांवरही आकशकंदील प्रकाशमान केले. दीपोत्सव हा प्रकाशाचा उत्सव असल्याने घरांच्या उंबरठ्यावर तसेच दुकानांपुढे काढलेल्या रांगोळ्यांवर पणत्या प्रज्वलित करुन सुवासिनींकडून प्रकाशोत्सव साजरा करण्यात आला. शहरात रंगीबेरंगी आकर्षक आकाशकंदील यानिमित्ताने पहावयास मिळाले. आकाशातील झगमगणा-या चांदण्यावरून ही कल्पना पुढे आली असावी.

टॅग्स :DiwaliदिवाळीNashikनाशिक