शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

स्थलांतरित मजुरांची ठेप; मात्र भिकाऱ्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 9:38 PM

नांदगाव (संजीव धामणे) : स्थलांतरित मजुरांसाठी मनमाड व नांदगाव येथे दोन निवारा केंद्र (शेल्टर्स) उभारण्यात आली असून, नांदगाव येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शेल्टरमध्ये राजस्थानचे ६, मध्य प्रदेशातील १२ असे १८ मजूर ठेवण्यात आले आहेत.

 स्थलांतरित मजुरांसाठी मनमाड व नांदगाव येथे दोन निवारा केंद्र (शेल्टर्स) उभारण्यात आली असून, नांदगाव येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शेल्टरमध्ये राजस्थानचे ६, मध्य प्रदेशातील १२ असे १८ मजूर ठेवण्यात आले आहेत. मनमाड येथे २२२ महाराष्ट्रीयन मजूर शासकीय शेल्टरमध्ये असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांनी दिली आहे. तथापि बसस्थानकात शंभरपेक्षा अधिक भिकारी बेवारस आहेत. त्यांना गुरु द्वाराच्या किचनमधून अन्न पुरविण्यात येत असले ेतरी त्यांच्या संचारामुळे ते कोरोनावाहक बनण्याची भीती व्यक्त केली जात आहे.प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात ठिकठिकाणी १३०० मजूर आढळून आले आहेत. त्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या असून, त्यांचे वैद्यकीय अहवाल व इतर बाबीची नोंद करण्याचे काम सुरु आहे. पंजाब राज्यातून आलेले १०० यात्री गुरुद्वारात आहेत. पंजाबच्या अतिरिक्त सचिवांचे पत्रानुसार त्यांचा अहवाल पंजाब राज्याला सादर करण्यात आला आहे. वरील सर्व मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्यासाठी खासगी संस्थांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. त्या सर्वांचे ना हरकत अहवाल तयार झाले की, शासकीय स्तरावरून त्यांच्या प्रवासाचे नियोजन करून त्यांची रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुक्यात एकही क्वॉरण्टाइन (विलगीकरण) कक्ष नाही. नांदगाव तालुक्यात मनमाड शहरातील एक रु ग्ण कोरोनाबाधित आला आहे. मनमाडमध्ये २४ संशयितांपैकी ४ घरीच विलगीकरण व १३ व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. याशिवाय सहा व्यक्तींचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. मनमाडमध्ये असलेल्या १३ संशियताना सेंट झेवियर शाळेत संस्थात्मक विलगीकरणासाठी स्थलांतरित करण्यात आले आहे.तालुक्यातील मजुरांना धान्य वाटप रेशन दुकानातून करण्यात आले आहे. जे मजूर निवारागृहात आहेत. त्यांच्यासाठी शासकीय यंत्रणा व बिगर सरकारी सेवाभावी संस्था यांच्याकडून शिजवलेले अन्न दोन वेळेस पुरविण्यात येत आहे. मनमाड येथे गुरु द्वारामध्ये सदर व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना शहरातील सेवाभावी संस्था आर्थिक व वस्तू स्वरूपात मदत करत आहेत.-------------यंत्रणेसमोर आव्हानमजुरांना आर्थिक मदत दिली जात नाही. स्थलांतरित मजूर तालुक्यात ठिकठिकाणी विखुरलेले असले तरी त्यांना एकत्र करून दळणवळणाच्या उपलब्ध सोयीनुसार आपापल्या गावी पाठविण्यासाठी अहवाल तयार करून ठेवणे हे मोठे आवाहन शासकीय यंत्रणांसमोर आहे. याशिवाय दुसºया जिल्ह्याच्या सीमा ओलांडून येणाºया प्रवाशांना प्रवेशापासून रोखणे तसेच अवैधधंदे रोखणे यासाठी पोलिसांची तारांबळ उडते. आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी कर्मचारी यांच्यासह अविरत काम करत आहे. नगर परिषदेचे कर्मचारी जीवनावश्यक दुकाने, भाजीपाला यांच्या वेळा व सामाजिक अंतर राखण्यासाठी मुख्याधिकारी श्रिया देवचके यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.----------------------------गरजूंच्या भोजनाची व्यवस्थामनमाडमध्ये रोटरी क्लब, लायन्स क्लब, युवा क्र ांती गणेश मंडळ, सावरकर नगरात रोटी संकलन केंद्र तसेच वैयक्तिक स्वरूपात पोळ्या, भाजीपाला, कांदे, बटाटे, आर्थिक मदत गुरु द्वारात जमा करण्यात येते. दररोज सुमारे १२०० गरजूपर्यंत जेवण दिले जाते. आमदार सुहास कांदे यांनी स्वतंत्र किचन उभारले आहे. तेथून शहरी भागासह ग्रामीण भागातसुद्धा २५०० ते ३००० लोकांपर्यंत जेवण पोहोचविले जात आहे.----------------------------------------आम्हाला आता घराची ओढ लागली आहे. येथे चांगल्या सुविधा मिळत आहेत; पण बायको, मुलांची आठवण मन अस्वस्थ करते. लवकरात लवकर घरी जायची व्यवस्था व्हायला हवी. आमच्याबरोबर होते ते दुसºया कंटेनरने गावी पोहोचले. आम्ही मात्र अडकलो.- भूपेंद्रसिंग राठोड,मुरैन, मध्य प्रदेश 

टॅग्स :Nashikनाशिक