देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ संध्याकाळ धुके पसरलेले असल्याने या मार्गावरून मार्गक्र मण करतांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी वाहनांचा अंदाज न आल्याने किंवा रस्त्यातील खड्यांमुळे मोठया प्रमाणावर अपघात घडून येतात. तसेच पावसामुळे तालुक्यातील रस्त्यांची अक्षरश चाळण झाली असून वाहनचालकांची वाहन चालवताना त्रेधातिरपीट उडते.अनेकवेळा अपघात देखील झाले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता गायब होऊन फक्त खड्डेच दिसत असल्याने वाहनचालकांना खड्डे चुकविण्याऐवजी रस्ता शोधावा लागत असल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह प्रवाशी, वाहनचालक करत आहेत.त्र्यंबकेश्वर तालुका पावसाचे माहेरघर असल्याने अतिपाऊसमुळे येथील रस्ते देखील वारंवार खराब होत असतात. सामुंडी ते कोजुली या पाच किलोमीटरच्या रस्त्याची अवस्था खड्यांमुळे बिकट झाली असून वाहने खिळखिळी झाली आहेत. रोजचे नोकर- चाकर व्याधींनी ग्रस्थ झाले आहेत. तसेच देवगाव परिसरातील देवगाव-वावीहर्ष, देवगाव श्रीघाट, टाकेदेवगाव- येल्याचीमेट, टाकेदेवगाव- वावीहर्ष या मार्गांवरील रस्त्यांना मोठे खड्डे पडले असून दिशादर्शक फलक नादुरु स्त झाले आहेत. देवगाव फाट्यावरील त्रिफुली गेल्या सात ते आठ महिन्यांपासून नादुरु स्त आहे.पाच वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांचे काम करण्यात आले होते.आजया रस्त्यांची चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. दुरावस्था झालेल्या रस्त्यांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवून मलमपट्टी केली जाते. मात्र, पावसाळ्यामध्ये या रस्त्यांची अवस्था जैसे थे राहते. सध्यस्थितीत रस्त्याची अवस्था नाजूक झाल्याने छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत, तर काहींना प्राणास मुकावे लागले. अनेकांना पाठीचे आजार उद्भवले आहेत.नाशिकहून खोडाळ्याला भाजीपाला ने आण करण्याचे काम असल्याने या मार्गावरून नेहमीच मार्गक्र मण असते. आव्हाटे ते देवगाव या सात किलोमीटर अंतरावर पहाटे पाच ते रात्री उशिरापर्यंत प्रचंड धुके पसरलेले असते. त्यामुळे धुक्यातून मार्गक्र मण करणे अवघड होते. तशा परिस्थितीत खड्यातून आदळआपट करत मार्ग शोधावा लागतो.- पांडुरंग खादे, भाजीपाला वाहतूक पुरवठादार.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागात रस्त्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 3:43 PM
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दक्षिण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून देवगाव त्र्यंबकेश्वर मार्गावरील बोरीचीवाडी येथे मुख्य रस्त्याला एक ते दीड फूट भगदाड पडले आहे. पावसाळयात डहाळेवाडी ते देवगाव या मुख्य रस्त्यावरील मार्गावर प्रचंड सकाळ संध्याकाळ धुके पसरलेले असल्याने या मार्गावरून मार्गक्र मण करतांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.
ठळक मुद्देबोरीचीवाडी येथे रस्त्याला भगदाड : वाहनचालक त्रस्त