नाशिक : गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडाच्या मोबदल्यापोटी २१ कोटी रुपये अदा करण्याच्या मुद्द्यावरून बुधवारी (दि.१९) भाजपातच जुंपली. सभागृह नेता दिनकर पाटील यांनी थेट स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांच्यावरच आरोप केले. शिवाय, आडके यांच्या विरोधात पाटील यांच्या प्रभागातील तीन नगरसेवकांनी ‘दबंगगिरी नही चलेगी’चे फलकही फडकावले. या प्रकारामुळे महापालिकेत पक्षाची पुरती शोभा झाली. दरम्यान, महापौरांनी २१ कोटी रुपये भूखंड मालकाला कसे काय दिले याबाबतचा अहवाल महासभेत ठेवण्याचे आदेश देतानाच या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकार काढण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे या प्रकरणात वाघ नावाच्या एका व्यक्तीच्या सहभागाची चर्चा सुरू असून, त्याचीही चौकशी करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.
भूखंड घोटाळ्यावरून वाद चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 1:23 AM