नाशिक : मुंबईहून मासेविक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यास फोन करून बोलावून घेत मारहाण करून लुटल्याची घटना सातपूर-त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरीजवळ घडली़शहाजन कतनयान काटू टाडाटिल जॉन (रा़६०४, बीवीजे रेसिडेन्सी, एवा स्टाइन सिटी, वसई, मुंबई) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ३० डिसेंबर २०१७ रोजी मासे विक्रीसाठी ते नाशिकमध्ये आले होते़ दुपारी ४ वाजेच्या सुमारास जॉन मासे विक्री करीत असताना संशयित सचिन रमेश धोत्रे (३०, रा़ महाराष्ट्र हौसिंग कॉलनी, आंबेडकर मार्केट, सातपूर) व त्याच्या तीन साथीदारांनी फोन करून नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरीजवळ बोलावले़ या ठिकाणी गेलेल्या जॉनच्या वाहनाची चावी काढून घेत क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली़ तसेच खिशातील पंधरा हजार रुपये बळजबरीने काढून घेतले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली़या प्रकरणी शहाजन जॉन यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी संशयित सचिन धोत्रे व त्याच्या तीन साथीदारांविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करून संशयित धोत्रे यास अटक केली आहे़
सातपूरला मासेविक्रेत्यास मारहाण करून लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:11 AM
नाशिक : मुंबईहून मासेविक्रीसाठी आलेल्या विक्रेत्यास फोन करून बोलावून घेत मारहाण करून लुटल्याची घटना सातपूर-त्र्यंबकेश्वर रोडवरील पपया नर्सरीजवळ घडली़
ठळक मुद्देमारहाण करून लुटल्याची घटना जिवे ठार मारण्याची धमकी