ठळक मुद्देपाणी योजना अखेरच्या घटका मोजत आहे.
लोहोणेर : गेल्या पंधरा दिवसांपासून येथील गिरणा नदीचे पात्र कोरडेठाक पडले असल्याने या नदीवर अवलंबून असलेल्या अनेक गावांच्यापिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे.गिरणा नदीपात्र कोरडेठाक पडल्याने विठेवाडी, सटाणा, देवळा, लोहोणेर, ठेंगोडा, वासोळ आदी गावातील गिरणा काठावरील पाणी योजना अखेरच्या घटका मोजत आहे.कधीही पाणीटंचाई निर्माण न झालेल्या लोहोणेर गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे तर याच गिरणा नदीवर अवलंबून असलेल्या देवळा व सटाणा शहरात तब्बल १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो आहे, असे विदारक चित्र निर्माण झाले आहे. मात्र या बाजूस कोणीही पहावयास तयार नाही हेही तितकेच महत्त्वाचे आहे.