सिडको : १९७९ साली नाशिक जिल्ह्णातील दिंडोरी व पेठ तालुक्यात प्रचारक म्हणून संघाचे कामकाज करीत असताना महाराष्टÑ, गुजरात व गोवा या तीन राज्यांची बैठक ठाणे जिल्ह्णातील तलासरी येथील विश्व हिंंदू परिषदेच्या वसतिगृहात पूर्ण वेळ काम करणाऱ्या प्रचारकांंसमवेत घेण्यात आली. सदरच्या बैठकीचे प्रमुख व प्रचाराचे मार्गदर्शक हे नरेंद्र मोदी असल्याने त्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत नाशिक संघाचे प्रचारक भीमराव गारे यांचा मोदी यांच्याशी परिचय झाला. यानंतर तब्बल ४१ वर्षांनी त्यांच्या या सहकाऱ्यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व पूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी तब्बल ४५ मिनिटे चर्चा करून स्नेहभोजनही घेतल्याने गारे आणि त्यांच्या सहकाºयांसाठी ही भेट अविस्मरणीय ठरली.सिडकोतील गणेश चौक भागात राहणारे भीमराव त्र्यंबक गारे (६६) यांचा गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय होता. वर्षभरापूर्वीच त्यांनी या व्यवसायातून निवृत्ती घेतली. गारे हे लहानपणापासूनच संघाचे काम करीत असून, आजही ते संघाच्याच कामात व्यस्त असतात. गावोगावी, खेड्यापाड्यात जाऊन संघाचा प्रचार व प्रसाराचे काम करीत असताना सन १९७९ साली तलासरी येथे बैठक झाली होती, त्यावेळी नरेंद्र मोदी असल्याने त्यांनी मार्गदर्शन केले आणि तेथेच भीमराव गारे यांची त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मात्र ४१ वर्षांत पुन्हा कुठलाही संपर्क अथवा भेट झाली नव्हती. दरम्यान, जिल्ह्णात प्रचार करतानाच अनेक कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी आता आपल्याला भेटतील काय? असा प्रश्न केला. त्यामुळे एकदा तरी मोदींना भेटण्याचे गारे यांनी ठरविले. त्यासाठी गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात पंतप्रधान कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर नुकतीच त्यांना संधी मिळाली यावेळी मोदी यांच्या निवासस्थानी ४५ सहकाºयांसह गारे भेटण्यास गेले. यानंतर मोदी यांनी, ‘क्या भीमराव कैसे हौ? कामकाज कैसा शुरु है’ अशी सुरुवातीलाच व्यक्तीश: नाव घेऊन विचारणा केल्याने भरून पावल्याची भावना गारे यांनी व्यक्त केली.टीममधील सहकारीयोगिणी चंद्रात्रे, स्मिता जोशी, सुमती जोशी, सुरेखा जोशी, अर्चना कु लकर्णी, अनुराधा शिरोडे, योगीता अमृतकर, सुनील चंद्रात्रे, रवि करंबेळकर, नरहर जोशी, प्रदीप रत्नपारखी आदींसह सुमारे ४५ सहकारी उपस्थित होते.
४१ वर्षांनी झाली पंतप्रधान मोदींची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 11:44 PM
१९७९ साली नाशिक जिल्ह्णातील दिंडोरी व पेठ तालुक्यात प्रचारक म्हणून संघाचे कामकाज करीत असताना महाराष्टÑ, गुजरात व गोवा या तीन राज्यांची बैठक ठाणे जिल्ह्णातील तलासरी येथील विश्व हिंंदू परिषदेच्या वसतिगृहात पूर्ण वेळ काम करणाऱ्या प्रचारकांंसमवेत घेण्यात आली. सदरच्या बैठकीचे प्रमुख व प्रचाराचे मार्गदर्शक हे नरेंद्र मोदी असल्याने त्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत नाशिक संघाचे प्रचारक भीमराव गारे यांचा मोदी यांच्याशी परिचय झाला. यानंतर तब्बल ४१ वर्षांनी त्यांच्या या सहकाऱ्यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व पूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
ठळक मुद्देसिडकोतील गारे यांच्यासह संघ कार्यकर्ते झाले भावनिक