पेट्रोल- डिझेलचे वाढलेले भाव याचा निषेध करण्यासाठी व शेतकरी - कामगार कायदे शासनाने मागे घ्यावे यासाठी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत पिंपळगाव पोलीस ठाण्यात आंदोलनाची कोणतीही पूर्वसूचना न देता पंतप्रधान मोदी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. गुरुवारी (दि.४) सायंकाळी हे आंदोलन केले होते. पिंपळगाव पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव यांच्या फिर्यादीवरून मोहन वाघ, सोपान मोगल, बंडू बागुल, गणेश गांगुर्डे, संतोष जगताप, महेश शिंदे, कडलग, सुनील भामरे, रवी बच्छाव, किशोर सोनवणे, वैभव दिवटे, नीलेश बागल यांच्यावर परवानगी न घेता आंदोलन केले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामदास गांगुर्डे करत आहेत.
पंतप्रधानांचा पुतळा दहन, कामगारांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:26 AM