येवला : आई वडील सर्वांनाच कळतात. तरीही आई वडील समजून सांगावे लागतात. असे सांगत आई माझा देव, आई माझा भाव या काव्य पंक्ती बरोबरच आता तुलाही शाळेत गेलं पाहिजे, आई तू शिकायला पाहिजे ही आजच्या आईआणि बापाची महती अरु ण इंगळे व राजेंद्र उगले यांनी आपल्या जुगलबंदीतून मांडली.शहरातील महात्मा फुले नाट्यगृहात समता प्रतिष्ठान येवला आयोजित प्रागतिक विचार व्याख्यानमालेच्या २१ व्या वर्षातील चौथे पुष्पअरु णराज प्रस्तुत सुश्राव्य काव्य गायन मैफल, मायवाप एक कृतज्ञता आई वडिलांची या विषतावर गुंफताना इंगळे व उगले, अलगट बोलत होते.आजच्या शाळांची व पूर्वीच्या शाळांची परिस्थिती मांडताना शाळा मध्ये आले आता बूट आणि टाय, मला बी आणशील का बाजारातून माय, ही कविता सादर केली.मांडवाच्या दारी मी दळीते सोनं बाई सोनं गं सोनं बाई सोनं, व्याहीन बाईच्या नाकामधी घालू बैलाची वेसण वेसण बाई वेसण. ही विडं बन अंगाई त्यांनी गायली. सासू सुनांचं भांडण हे आईच्या फोन मुळे होतात. जातं अडगळीला गेलं आता आई अडगळीला जाते की काय असा प्रश्न पडतो. अशी खंत इंगळे, उगले यांनी व्यक्त केली.कवी अरु ण इंगळे, राजेंद्र उगले, दत्ता अलगट, नरेंद्र जाधव, तबलजी वैद्य, व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य भाऊसाहेब गमे, अर्जुन कोकाटे, आदी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी टाकून आजच्या कार्यक्र माचे उदघाटन करण्यात आले.प्रस्ताविक समता प्रतिष्ठानचे अर्जुन कोकाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर दराडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नानासाहेब कुº्हाडे यांनी करून दिला.आभार प्रदर्शन आजीज शेख यांनी केले.
काव्य गीतांची संगीतमय मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 6:28 PM
आई वडील सर्वांनाच कळतात. तरीही आई वडील समजून सांगावे लागतात. असे सांगत आई माझा देव, आई माझा भाव या काव्य पंक्ती बरोबरच आता तुलाही शाळेत गेलं पाहिजे, आई तू शिकायला पाहिजे ही आजच्या आईआणि बापाची महती अरु ण इंगळे व राजेंद्र उगले यांनी आपल्या जुगलबंदीतून मांडली.
ठळक मुद्देप्रागतिक विचार : व्याख्यानमालेचे चौथे पुष्प