घोटी : आदिवासी मुलींबद्दल अभ्यासक्रमात अश्लील शब्दात कविता आभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने कवी दिनकर मनवर विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असुन कवी मनवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.माथेफिरू कवी दिनकर मनवर याने अत्यंत अश्लील वर्णन करून आदिवासी मुलींचा विनयभंग करणारी कविता लिहिली असून, मुंबई विद्यापीठाने देखील कोणताही विचार न करता ती कविता बी. ए.च्या तिसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत आता श्रमजीवी संघटना व महीला ठीणगी आक्रमक झाली आहे. या माथेफिरू कवी दिनकर मनवर आणि बेजबाबदार विद्यापीठ प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी श्रमजीवी महिला ठिणगीच्या कार्यकर्त्या मुंबई विद्यापीठात धडकणार आहेत.मुंबई विद्यापीठाच्या बीए तिसऱ्या वर्षाच्या अभ्याक्रमात पाणी कसं अस्तं या शिर्षकाखाली प्रकाशित केलेल्या कवितेत आदिवासी मुलींची मानहानी करणारे, विनयभंग करणारे वर्णन आहे. या कवितेमुळे समाजात विशेषतः महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या महिला ठिणगीच्या कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले असून आता याविरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे. .सोमवारी महिला ठिणगीच्या महिला आणि युवती मुंबई विद्यापीठात धडक देणार असून संबंधित सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी श्रमजीवी महिला ठिणगीच्या वतीने करण्यात आली. मोर्चानंतर सर्व महिला युवतीनी इगतपुरी पोलीस ठाण्यात जाऊन कवी दिनकर मनवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या मोर्चात श्रमजीवी संघटनेचे जिल्हाउपप्रमुख तुकाराम लचके जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, जिल्हा महीला ठीणगी प्रमुख सुरेखा मधे, तालुका प्रमुख संजय शिंदे, तालुका सचिव शांताराम भगत, महीला ठीणगी प्रमुख लता मेंगाळ, निता गावंडा, तुकाराम मोडके, संतोष ठोंबरे, बारकु वारे, तानाजी शिद, रामदास भगत, विजय मेंगाळ, सुनिल लोहरे यशवंत पारधी, तानाजी कुंदे यांच्यासह आदीवासी बांधवांनी सहभाग घेतला.
आदिवासी मुलींबद्दल अभ्यासक्रमात अश्लील शब्दात कविता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 3:53 PM
घोटी : आदिवासी मुलींबद्दल अभ्यासक्रमात अश्लील शब्दात कविता आभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने कवी दिनकर मनवर विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक झाली असुन कवी मनवर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
ठळक मुद्देकवी दिनकर मनवर विरोधात श्रमजीवी संघटना व महीला ठीणगी आक्रमक, इगतपुरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा.