देवगांव : मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मोहिते गुरुजी वरिष्ठ महाविद्यालय आणि यशोदाबाई मोहिते कनिष्ठ महाविद्यालय खोडाळा-जोगलवाडी येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा विकास आणि प्रसारास चालना मिळावी या दृष्टिकोनातून महाविद्यालयातील मराठी विभागाच्या संकल्पनेतून निबंध स्पर्धा व काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना प्रा. दिलीप भोये, प्रा. रघुनाथ मोरे, प्रा. दीपक कडलग, प्राचार्य प्रा. यशवंत शिद, प्रवर्तन काशीद, प्रा. नवनाथ शिंगवे आदींनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी गिरीवासी सेवा मंडळाचे खजिनदार भास्कर खोळंबे, सदस्य प्रदीप मोहिते, उपप्राचार्य प्रा. तुकाराम रोकडे, प्रा. मारुती पंडित, संदीप वाघचौरे, प्रा. कैलास पाटील प्रा. अमित गावित आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मेघा सोनटक्के-काशीद यांनी केले. तर आभार प्रा. निकिता वारघडे यांनी मानले.