नाशिक : कोरोनाचे संकट जिल्ह्यात थैमान घालत असल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणीहोत आहे. यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर अनेक निराधारांना जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत उपेक्षितांच्या मुखी दोन घास पडावेत, त्यांचेही जगणे सुलभ व्हावे,या समाजिक दातृत्वाच्या भावनेतून जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकव शैक्षणिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह मास्क आणिसॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. यातून सामाजिक आरोग्य जपण्याचा वसा घेतल्याचे आशादायी चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. हा मदतीचा महापूर गोदातीरी भरभरून वाहत असल्याने माणुसकीचा दाटलेला गहिवर सर्वत्र दिसून येत आहे.घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन असल्याने ग्रामीणभागासह आदिवासी कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने सर्वत्र मदतीचे हात पुढे येत असताना इगतपुरी न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्वखर्चातून ५० हजार रुपयांचा किराणामाल वाटप करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी वाड्या-पाड्यावर रोजगाराचा प्रश्नफार मोठा उभा ठाकला असून, सर्वच स्तरातून मदतीचा ओघ वाढत आहे. त्याबरोबरच अशीच मदत इगतपुरीच्या मुख्य न्यायाधीश रिफयान एन. खान यांनी स्वखर्चाने ५० हजार रु पयांचा किराणा व साहित्य घोटी परिसरातील प्रचितराय बाबानगर, सांडूनगर, खंबाळेवाडी व परिसरातील १५० कुटुंबांना वाटप करण्यात आले.ग्रामीण भागात साहित्य वाटप करीत असताना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व तसेच तोंडावर कायमस्वरूपी रु माल बांधून आपली आणि परिवारातील तसेच इतरांची कोरोनाच्या प्रादुर्भावापासून स्वत:ला वाचवू शकतो याची माहिती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना याप्रसंगी केली. याप्रसंगी इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना पागिरे, घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सहायक उपनिरीक्षक विलास घिसाडी, संतोष दोंदे, शीतल गायकवाड, प्रकाश कासार, लहू सानप आदी कर्मचारी उपस्थित होते.ओझर ग्रामपालिकेला जंतुनाशक फवारणी रसायन भेटओझर टाउनशिप : देशभरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यात त्याचा शिरकाव झाल्याने सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांसह पोलीस खाते वआरोग्य विभाग कसोशीचे प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या नियंत्रणासाठी पोलीस व वीजवितरण कर्मचारी आरोग्य विभाग कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांचे आरोग्य या काळात चांगले राहावे व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या वतीने शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांनी जंतुनाशक फवारणीसाठी ५० लिटर सोडियम हायपोक्लोराइड ओझर ग्रामपंचायतीला दिले. तसेच पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, वीजवितरण कर्मचारी यांच्यासाठी सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र शिंदे, प्रकाश महाले, वसंत गवळी, सागर शेजवळ, नंदू मंडलिक रत्नाकर कदम, दिलीप कदम, राऊफ पटेल, कपिल भंडारे, सोमनाथ चौधरी, सर्कल प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, सागर शेजवळ, रज्जाक मुल्ला आदी उपस्थित होते.केटा फार्माकडून पीएम केअर फंडाला १० लाखसिन्नर : मुसळगाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीत ३५ वर्षांच्या कालावधीत दीपस्तंभासारखे कार्य उभे केलेल्या केटा फार्मा ग्रुपच्या वतीने पीएम केअर फंडाला १० लाखांची मदत करण्यात आली आहे. कोरोनासारख्या रोगाच्या राष्ट्रीय आपत्तीत सामाजिक जाणीव ठेवून दिलेल्या या योगदानाबद्दल केटा फार्मा ग्रुपचे कौतुक होत आहे.निरनिराळे फार्मास्युटिक प्रॉडक्ट बनवून कायम संशोधनात मग्न असलेल्या श्रीकांत करवा आणि प्रवीण मारवार यांच्या मार्गदर्शनाखाली केटा फार्माची वाटचाल जोमाने सुरू आहे. सोसायटीच्या माध्यमातून कामगारांना घरे बांधण्यासाठी केलेली मदत, कामगार क्रेडिट सोसायटी स्थापन करून कामगारांना आर्थिक पाताळीवर स्वावलंबी करण्याचा प्रयत्न, शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या वावी वेशीला वाहतूक बेट सुशोभित करून शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचा प्रयत्न असे विविध उपक्रम स्वागतार्ह ठरले आहेत.दरम्यान, केटा फार्मा कारखान्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अन्य कारखाने व संस्थांनी कोरोनासारख्या संकटात गोरगरिबांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज व्यक्त करण्यातयेत आहे.
वेदनेचा हुंकार अन् माणुसकीचा गहिवर..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 11:01 PM
समाजिक दातृत्वाच्या भावनेतून जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत. गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. यातून सामाजिक आरोग्य जपण्याचा वसा घेतल्याचे आशादायी चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. हा मदतीचा महापूर गोदातीरी भरभरून वाहत असल्याने माणुसकीचा दाटलेला गहिवर सर्वत्र दिसून येत आहे.
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : जिल्हाभरात सामाजिक संघटनांतर्फे गरजूंना विविध साहित्याचे वाटप