नगरसुल : परिसरात पोळ कांदा सडला असून रोपेही खराब झाली असून भुईमूगाला कोंब,सततच्या पावसामुळे पिके धोक्यात आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.येवला तालुक्यातील,नगरसुल, परीसरा सह ,खिर्डीसाठे,जायदरे ,आहेरवाडी,वहीत हा. सावरगाव,वाईबोथी , राजापूर, ममदापूर, कोळगाव, खरवडी, देवदरी,व तालुक्यातील उत्तर पुर्व भागात सतत पडणा?्या पावसाने शेतक?्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. येथे शेतक?्यांनी लाल कांदा लागवड केली असली तरी दररोज सुरू असलेल्या पावसामुळे शेतक?्यांची कांदा पिके संकटात सापडले आहेत. यावर्षी कांद्याचे काळे उळे हे महाग असून शेतक?्यांनी अवाच्या सव्वा किमतीने विकत घेऊन उळे टाकली होती.पण पाऊस दररोज असल्याने कांदा व कांद्याचे रोपं खराब होऊन शेतक?्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनाचा कहर आणि शेतकऱ्यांच्या पिकांकडे पाऊसाचा जोर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कांदा रोपे हे खराब झाली असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तसेच काढणीला आलेला भुईमूग, सोयाबीन,या पिकाची मोठ्या प्रमाणावर खराब झाली आहे.शेतकरी हा नेहमीच आशावादी राहून शेतीकामात व्यस्त असतो परंतु निसर्गाच्या या अस्मानी सुलतानी संकटांचा सामना हा शेतकरी वर्गाला करावा लागतो आहे. भुईमूगाचया शेंगा या जमीतच कुऊन जात आहे. व कोंब फुटतात आहे. मका सोंगणी ही पाऊसामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उतरा नक्षत्र सुरू झाल्या पासून आठ ते दहा दिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गाचे खरीपाच्या मका, भुईमूग, सोयाबीन, कपाशी,बाजरी,या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.हातातोडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतक?्यांच्या शेतात लाल व उन्हाळ कांद्यासाठी टाकलेली रोपे संपूर्ण खराब झाली असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत. कांदा उळे भाव ३२००/ते ३९०० हजार किलो म्हणजे १६ हजार रुपये पायलीने विकत घेऊन टाकलेले होते.
शेतकरी वर्गाचे पुढील हंगामाचे नियोजन करताना वेळा पत्रक बदलण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच मागील वर्षीचा उन्हाळ कांदा साठवणूक केलेली होती. काही कांदे हे बरेच खराब झाले व शिल्लक असलेल्या कांद्याला शासनाचा निर्यात बंदीची फटका बसला आहे. कांद्याला चांगला भाव मिळतव शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतक?्यांनी केली आहे.