गोंदे दुमाला : इगतपुरीच्या पूर्व असलेल्या अस्वली, बेलगाव कुऱ्हे, नांदूरवैद्य, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रूक, कुऱ्हेगाव, जानोरी आदी गावांमध्ये बैलाची सजावट करून पारंपारिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला.
ग्रामीण भागात पोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यांत्रिक युगात जनावरांची संख्या कमी होत आहे. परंतु या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना बैलजोडीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा. सोमवारी (दि. ६) सकाळपासूनच सर्जा-राजाला सजवण्यास सुरुवात झाली.
इगतपुरीच्या पूर्व भागात नांदूरवैद्य, अस्वली, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला आदी गावांमध्ये बैलपोळ्याच्या निमित्ताने वातावरणात उत्साह जाणवत होता. बैलपोळ्यानिमित्त ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मातीपासून बनवलेल्या बैलाची पूजा करतात. आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे शेतकऱ्यांनी बैलांना सजावट केली होती.
यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. मारुती मंदिराजवळ आल्यानंतर बैलांना सलामी देऊन घरी आणण्यात आले. यानंतर बैलांची पूजा केल्यानंतर नैवैद्य दाखवण्यात आला. इगतपुरी तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेती असल्यामुळे पोळा हा सण साजरा करतात. (०६ गोंदे दुमाला,१)
१) गोंदे दुमाला येथे पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा करतांना ग्रामस्थ.
२) नांदूरवैद्य येथे भैरवनाथ महाराज मंदिराजवळ सर्जा-राजाला सलामी देण्यासाठी आणले जात असताना.