इंदिरानगर : अहमदनगरच्या कुविख्यात चन्या बेग टोळीतील गुंड व घातक शार्प शूटर अशा तीघा गुन्हेगारांना कोणतीही चौकशी न करता स्व मालकिच्या सदनिकेत भाडेतत्वाचा करार करून आश्रय दिला; मात्र याबबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यापासून दडविल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात पार्वती अपार्टमेंटमधील रहिवासी घरमालक रमेश सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या सदनिके तून पोलिसांनी रविवारी पहाटे कुख्यात गुंडांच्या मुसक्या शिताफिने आवळल्या. शहरात मोठा कांड घडविण्याच्या उद्देशाने त्यांनी आश्रय घेतल्याचा पोलिसांनी संशय आहे.दहशतवादविरोधी पथकाने काही वर्षांपूर्वी सातपूर परिसरात दहशतवादी बिलालला अटक केली होती. त्यानंतर घर मालकांनी भाडेतत्वाचा करार भाडेकरूंशी करताना आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात त्या कराराची माहिती द्यावी व आवश्यक कागदपत्रांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पुर्तता करून पोलिसांकडून पडताळणी करुन घेत नाहरकरत दाखला प्राप्त करावा, असा आदेश तत्कालीन पोलिस आयुक्तांनी काढला होता. मात्र अद्यापही याबाबत नागरिकांकडून टाळाटाळ केली जाते.पाथर्डी परिसरातील विक्रीकर भवनाच्या पाठीमागे असलेल्या पार्वती अपार्टमेंटच्या तीसर्या मजल्यावरील १३ क्रमांकाची सदनिका सावंत यांच्या मालकीची आहे. हा परिसर तसा नव्याने विकसीत होत असल्यामुळेया भागात वर्दळीही कमी असते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून अहमदनगरच्या मोक्यातील सराईत गुन्हेगार शाहरूख शेख, सागर पगारे, बारकू अंभिरे यांया मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन विदेशी बनावटीचे पिस्तूल, चाळीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. शहरात मोठे कांड करण्याचा कट या तिघांनी रचला होता; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आणि या कुख्यात गुंडांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. मात्र याबाबत जर घरमालकाने संबंधितांची माहिती पोलिसांना याअगोदरच दिली असती तर कदाचित इतक्या कालावधीपर्यंत त्यांना वास्तव्य करता आले नसते. सावंत यांनी माहिती दडविल्याप्रकरणी त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कुख्यात गुंड शार्पशूटर ज्या ‘पार्वती’च्या फ्लॅट क्रमांक तेरामध्ये आश्रयाला होते त्या घरमालकावर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 2:23 PM
घर मालकांनी भाडेतत्वाचा करार भाडेकरूंशी करताना आपल्या परिसरातील पोलीस ठाण्यात त्या कराराची माहिती द्यावी व आवश्यक कागदपत्रांची सुरक्षिततेच्या दृष्टीने पुर्तता करून पोलिसांकडून पडताळणी करुन घेत नाहरकरत दाखला प्राप्त करावा, असा आदेश तत्कालीन पोलिस आयुक्तांनी काढला होता. मात्र अद्यापही याबाबत नागरिकांकडून टाळाटाळ केली जाते.
ठळक मुद्देशहरात मोठा कांड घडविण्याच्या उद्देशाने त्यांनी आश्रय घेतल्याचा पोलिसांनी संशय १३ क्रमांकाची सदनिका सावंत यांच्या मालकीची