नाशिक : द्वारका येथील बेला पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भरदुपारी मुंबईनाका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, सहा जीवंत काडतुसे धारधार शस्त्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, परजिल्ह्यातील तरुणांची टोळी द्वारका भागातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकू न लूट करणार असल्याची गुप्त माहिती उपनिरिक्षक एस.सी.सोनोने, हवालदार संजय भिसे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ मुंबई-आग्रा महामार्गावरील उडड्डाणपूलाच्या १२७ क्रमांकाच्या पोलजवळ सापळा रचला. महामार्गाच्या समांतर रस्त्यावर एक मोटारसायकल (एम.एच.१४ ईएफ ५६९७) संशयास्पदरित्या उभी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या मोटारसायकलवर तीघे संशयित बसलेले होते व दोघे तेथे उभे राहून त्यांच्याशी चर्चा करत होते. एकूण पाच संशयितांची टोळी असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यापैकी एक संशयित पोलिसांना गुंगारा देण्यास यशस्वी झाला. विनोद उर्फ रजेसिंग राजपूत (२४ रा. शिरपूर, धुळे), सनी युवराज राजपूत, लहू प्रकाश टोपे (२७ रा.वाकी, खेड), निखील भगवान बेंडाळे (२६) या चौघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता पोलिसांना धारधार २७ सेंमी लांबीचा मोठा सूरा, गावठी पिस्तूल, सहा जीवंत काडतूसे, मोबाईल, मोटारसायकल, रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत चौघांच्या मुसक्या बांधल्या. बेला पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लूट करण्याची पुर्वतयारीत ही टोळी होती, अशी कबुली संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा एक साथीदाराची ओळख अद्याप पटू शकलेली नाही तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊ न फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलीसांकडून पुणे, धुळे, नाशिक जिल्ह्यात तपास केला जात आहे.पोलिसांची सतर्कता; जबरी लूट टळलीपोलिसांच्या सतर्कतेमुळ व तत्काळ कृती केल्याने शहरात होणारी जबरी लूटीची घटना टळली. या पाच संशयितांच्या टोळीने दरोड्याची पुर्वतयारी पूर्ण केली होती. बेला पेट्रोलपंप कसा व कधी लुटायचा? याबाबत कट शिजविला होता; मात्र पोलिसांना खात्रीशिर मिळालेली गुप्त माहिती आणि त्यांनी त्या माहितीच्या आधारे दाखविलेली तत्परतेमुळे गुन्हा थांबविण्यास यश आले. चार संशयित हाती लागले असून फरार झालेला त्यांचा एक साथीदारालाही लवकरच अटक केली जाणार असल्याचे उपनिरिक्षक सोनोने यांनी सांगितले.
पोलिसांची सतर्कता : भर दुपारी दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 4:06 PM
अंगझडती घेतली असता पोलिसांना धारधार २७ सेंमी लांबीचा मोठा सूरा, गावठी पिस्तूल, सहा जीवंत काडतूसे, मोबाईल, मोटारसायकल, रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करत चौघांच्या मुसक्या बांधल्या
ठळक मुद्देपोलिसांची सतर्कता; जबरी लूट टळलीदेशी बनावटीचे पिस्तूल, सहा जीवंत काडतुसे शस्त्रे हस्तगत