शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

पोलिसांना दादागिरी अन् रस्त्यात धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:17 AM

शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एकीकडे पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मद्यपी व गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून थेट क र्तव्यावर असलेल्या पोलिसांनाच दमबाजी व धक्काबुक्की केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. अशाप्रकारच्या शहरात दोन घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.

नाशिक : शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एकीकडे पोलीस प्रशासनाकडून सर्वोपरी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मद्यपी व गुंडप्रवृत्तीच्या लोकांकडून थेट क र्तव्यावर असलेल्या पोलिसांनाच दमबाजी व धक्काबुक्की केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. अशाप्रकारच्या शहरात दोन घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, सातपूर औद्योगिक वसाहतीत एका हॉटेलमध्ये शनिवारी (दि.९) संशयित योगेश फुला हिरे (४०) याने मद्यप्राशन केले, मात्र त्यानंतर पैसे न देताच तो जाऊ लागला. त्यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक तपनकुमार शिवप्रसाद साव यांनी पैशांची मागणी त्याच्याकडे केली, मात्र त्याने शिवीगाळ करत साव यांना मारहाण केली. त्यांच्या अंगावरील कपडे फाडून हॉटेलच्या गल्ल्यातून ५०० रु पये बळजबरीने काढून घेत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या वादाची माहिती मिळताच तत्काळ सातपूर पोलीस ठाण्याचे हवालदार सूर्यवंशी व जावेद खलील शेख हे घटनास्थळी पोहोचले. यावेळी पोलीस कर्मचारी शेख यांनी हिरे यास समजावून सांगत असतानाही त्याचा धुमाकूळ सुरूच होता. त्यावेळी हवालदार सूर्यवंशी यांनी मोबाइलमध्ये गोंधळ टिपण्याचा प्रयत्न केला असता, मद्यधुंद हिरे याने त्यांच्या हातातून मोबाइल हिसकावून घेत जमिनीवर आपटला. त्यानंतर त्याने स्वत:चे डोकेदेखील फरशीवर आपटून फोडून घेतले आणि ‘तुमची नोकरीच घालवितो...’ असा दम भरल्याचे शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात साव यांच्या फिर्यादीनुसार जबरी चोरी, मारहाणीचा गुन्हा तर, शेख यांच्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक मजगर व उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.वाहतूक पोलिसाच्या गणवेशाला ‘धक्का’शनिवारी (दि.९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास द्वारका येथील समांतर रस्त्यावर दत्ता किसन गायकवाड (४१, रा. विजयनगर, औरंगाबाद नाका) याने ट्रॅव्हल बस नो-पार्किंग झोनमध्येउभी केली. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक पोलीस भूषण सूर्यवंशी यांनी धाव घेत बस काढून घेण्यास सांगितले. त्याचा राग येऊन संशयित गायकवाड याने, ‘तू मला ओळखत नाही. मी देवकर मॅडमचा नातेवाईक असून ही गाडी इथेच उभी राहील...’ असे एकेरी बोलत त्यांच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गायकवाडविरुद्ध कारवाई केली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी