चांदवड: तालुक्यातील काजीसांगवी येथील पोलीस पाटील दिपक ठाकरे यांनी उत्पन्नाच्या दाखल्यावरील उत्पन्न कमी न लावल्यामुळे तलाठी मिलींद गुरूबा यांना बेदम मारहाण केली अशी फिर्यÞाद गुरु बा यांनी चांदवड पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी दिपक ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरु बा उपजिल्हारु ग्णालयात उपचार घेत आहे.मिलींद गुरु बा हे काजीसांगवी येथील तलाठी कार्यालय दैनंदिन कामकाज करत असतांना ठाकरे हे तलाठी कार्यालयात आले असता त्यांनी आपल्या भावासाठी उत्पन्नाचा दाखला मागितला. त्यावर तलाठी यांनी भाऊ काय करतात असे विचारले. तेव्हा त्याचे भाऊ घोटी येथे शिक्षक असल्याचे सांगतले. त्यावर गुरूबर यांनी मला त्यांचा १६ नंबरचा फॉर्म भरु न हवा आहे. यावर दिपक ठाकरे मी गावाचा पाटील आहे. तुला समजत नाही का असे म्हणून तु मला उत्पन्नाचा दाखल दे असे म्हणू लागला. यावर तलाठी यांनी मी देऊ शकत नाही. यावर ठाकरे यांनी चिडून तलाठी गुरु बा यांच्या पोटावर हाताने जबर मारहाण केली. ठाकरे एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी तलाठ्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर तलाठी मिलींद गुरु बा यांनी चांदवड पोलीस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला आहे. ते सध्या उपजिल्हा रु ग्णालयात उपचार घेत आहे.------------------------------तलाठी संघटनेने घेतली पोलीस उपअधिक्षकाची भेटयावेळी चांदवड पोलीस ठाण्यात आलेल्या पोलीस उपअधिक्षकांची संघटनेने भेट घेवून सरकारी कर्मचा-यावर गावातील पाटलाने मारहाण केली आहे. यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली. आम्ही त्वरीत संबंधीत पाटलावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलीस उपअधीक्षक साळवे यांनी दिले.-----------------------उपजिल्हाधिकारी करणार कारवाईपोलीस पाटील दिपक ठाकरे यांच्यावर आम्ही त्वरीत कारवाई करणार असून यात दोषी आढळ्यास पोलीस पाटील पद रद्द करण्यात येईल. तलाठ्याचा आदेश पाटलाने मानायचा असतो. मात्र या ठिकाणी महसूल यंत्रनेला गैरवापर करायला भाग पाडण्यास जर कोणी मजबूर करत असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. आम्ही या प्रकरणात कसूर करणार नाही. सरकारी कर्मचा-यावर मारहाण करणे व काम अडथळा निर्माण करणे हे पोलीस पाटील पदासाठी घातक आहे. त्यामुळे लवकरच आम्ही कठोर कारवाई करु .-सिध्दार्थ भंडारे , चांदवडउपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी
पोलीस पाटलाकडून तलाठयास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 12:16 PM