१६ लाखांचा मुद्देमाल जप्त : चौघांना अटक, दोन फरार, मध्य प्रदेश, अहमदनगर, ठाणे जिल्ह्यातील आरोपी
नाशिक : दुचाकीवरून धूम स्टाइल येत क्षणार्धात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया इराणी टोळीला नाशिक पोलिसांनी चांगलाच ब्रेक लावला आहे़ मध्य प्रदेशातील अतुल राजेश बामनका (१८, पिपलधार, सेंधवा मध्य प्रदेश) व अशोक अर्जुननाथ जोगी (२६, निवालीरोड, सेंधवा) या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, शहरातील पंधरा गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे़ त्यांच्याकडून १६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करण्यात आला असून उर्वरित फरार दोघांचा शोध सुरू आहे़१४ सप्टेंबरला शहरात एकाच दिवशी महिलांच्या अंगावरील सहा सोनसाखळी खेचण्याच्या घटना घडल्या होत्या़ यातील गुन्ह्याची पद्धत पाहता यामध्ये इराणी टोळ्याचा सहभागाची शक्यता वर्तविण्यात आली होती़ त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील आंबिवली येथे छापा मारून संशयित समीर मुशिर सय्यद (४०, अंबिवली, ता. श्रीरामपूर, जि.नगर) यास ताब्यात घेतले़ त्याने १७ ग्रॅम सोने काढून देत टोळीप्रमुखाचा नाव व पत्ता पोलिसांना दिला होता़पोलिसांनी मध्य प्रदेशातील सेंधवा येथून संशयित वासिम शमिम पटेल (१९, सेंधवा) यास ताब्यात घेऊन कसून चोकशी केली असता त्याने बामनका व जोगी यांची नावे सांगितली़ स्थानिक पोलिसांच्या मदतीने या ठिकाणी छापा मारून दोघांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून स्विफ्ट डिझायर कार, टीव्हीएस आपाची, बजाज पल्सर दुचाकी व १५ तोळे, तर दुसºया चोरीतील ८.५ तोळे सोने जप्त केले आहे़ शहरात १४ चेनस्नॅचिंग गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे़ सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, शिवाजी भालेराव, पंकज पळशिकर, सुरेश शेळके, प्रवीण वाघमारे आदिंनी ही कामगिरी केली़महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचणाºया इराणी टोळीतील चौघांना अटक केली असून, फरार असलेल्या दोघांचा शोध सुरू आहे़ या टोळीतील आणखी संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे या टोळीत भिवंडी, नगर व मध्य प्रदेश अशा तीन ठिकाणच्या चोरट्यांचा समावेश आहे़- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक