शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

पोलीसाच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर केले लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2018 2:58 PM

नाशिक : पोलीस दलाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास घडली. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या ...

ठळक मुद्देवीष पाजून जीवे ठार मारण्याची धमकीसंशयित भूषण हा शहराच्या हद्दीतून पसार झाला भूषणविरुध्द बलात्कार, जबरी लूटीचा गुन्हा दाखल

नाशिक : पोलीस दलाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी (दि.१) रात्रीच्या सुमारास घडली. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पूत्राने युवतीला बहाण्याने बोलावून लूटमार करत वीष पाजून जीवे ठार मारण्याची धमकी देत शारिरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस मुख्यालयाच्या वसाहतीत गंगापूररोड येथे राहणारा संशयित आरोपी भूषण नानासाहेब जाधव याने शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिडित युवतीला लग्नासाठी कागदपत्रे घेऊन कॉलेजरोड येथे बोलावले. युवती आली असता भूषण याने ‘कागदपत्रे का आणली नाहीत’ असे सांगून शिवीगाळ करत मारहाण क रण्यास सुरूवात केली. पिडितेला ‘मी डॉक्टरकडे घेऊन जातो’ असे तिच्यासोबत आलेल्या मैत्रिणीला सांगून आडगाव शिवारातील निर्मलनगर येथे घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निर्मलनगरमध्ये पिडित युवतीला रात्रभर डांबून ठेवत मारहाण केली तसेच वीष पाजून जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने तिच्यावर शारिरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केल्याचे पिडित युवतीने फिर्यादीत म्हटले आहे. संशयित भूषण याने पिडितेचा मोबाईल, पैसे हिसकावून घेत पोबारा केला आहे. पिडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांनी संशयित भूषणविरुध्द बलात्कार, जबरी लूटीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास महिला उपनिरिक्षक पाटील करीत आहेत.---इन्फो--संशयित फरार; शोध सुरूघटनेनंतर संशयित भूषण हा शहराच्या हद्दीतून पसार झाला आहे. महिला उपनिरिक्षक पाटील यांच्यासह पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस मुख्यालय वसाहतीत त्याच्या राहत्या घरी तपासणी केली; मात्र तो घरी आढळून आला नाही. दरम्यान, तपासणी अंमलदार पाटील यांनी त्याच्या वडिलांकडे विचारपूस करीत त्याच्या काही मित्रांकडेही चौकशी केली आहे. लवकरच संशयित भूषणला ताब्यात घेण्यात येईल त्यादृष्टीने शोध सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले

टॅग्स :Rapeबलात्कारnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी